कोकणातील सावंतवाडी येथे एक मुसलमान त्यांच्या खासगी वाहनातून गोवंश मांस (Beef) घेऊन येत होता. तेव्हा त्याला हिंदुत्वनिष्ठांनी पकडले आणि जोरदार चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याला अटक करून गुन्हा दाखल केला.
सावंतवाडी येथील बाहेरचावाडा येथे राहणारा मोहमद सरफराज भाऊद्दीन ख्वाजा (वय ४५) हा सुमारे १३० किलो गोवंश मांस (Beef) आपली स्वतःची मारुती स्विफ्ट डिझायर गाडीमधून बेळगाववरून सावंतवाडी येथे आणत असताना माडखोल सापळे स्टॉप या ठिकाणी मुद्देमालासह मिळाला. दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कन्हाळे यांचे समक्ष मुद्देमालाचा पंचनामा करून वैद्यकीय अधिकारी यांनी राखून ठेवलेले सॅम्पल वगैरे प्रक्रिया पंचसमक्ष पूर्ण करून सावंतवाडी पोलीस ठाण्यात मोहम्मदवर गुन्हा दाखल केला आहे. (Beef) त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशा सामाजिक शांतता बिघडवणाऱ्या गुन्हेगारावर योग्य ती कायदेशीर कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community