हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात पोलिस विभागाकडून राष्ट्रीय महामार्गावरील ओव्हरस्पीड वाहनावर दंडात्मक कारवाईसाठी इंटरसेप्टर वाहनांची मदत घेतली जात आहे. या वाहनामुळे वाहन चालकांनी योग्य गतीने वाहने चालवून अपघात टाळण्याचे प्रयत्न केले जात आहे. (Hingoli)
हिंगोली (Hingoli) जिल्हयातून हिंगोली-रिसोड तसेच वाशीम-कळमनुरी-आखाडा बाळापूर-नांदेड या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाल्यामुळे या महामार्गावरून वाहन चालक भरधाव वेगाने वाहने चालवित असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या मार्गावर अपघाताची संख्या वाढू लागली आहे.
दुचाकी वाहन चालकांचे हेल्मेट नसल्यामुळे तर चार चाकी व इतर वाहनांची ओव्हरस्पीडमुळे अपघात होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील दोन वर्षात जिल्हयात १९ हजार वाहनांवर कारवाई झाली आहे. या मार्गावरून वाहनांसाठी ८० किलो मिटर प्रति तास या गतीची मर्यादा असतांनाही वाहन चालक १०० ते १२० किलोमिटर प्रति तास वाहनाने चालवित आहेत. त्यामुळे या वाहना चालकांना वारंवार सूचना देऊनही वाहनांची गती कमी होत नसल्यामुळे आता पोलिस विभागाने या महामार्गावर इंटरसेप्टर वाहन उभे करून त्यातून जादा गती असलेल्या वाहनाचे छायाचित्र घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची मोहिम सुरु केली आहे. (Hingoli)
हेही वाचा- Vehicle : जुने वाहन स्वेच्छेने मोडीत काढल्यास नवीन वाहनासाठी १५ टक्के कर सवलत; मंत्रिमंडळाचा निर्णय
पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे निरीक्षक वाघमारे, उपनिरीक्षक रावसाहेब घुमनर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेषराव राठोड, जमादार संतोष घुगे, गजानन राठोड, चव्हाण, शेखर देशमुख यांच्यास कर्मचाऱ्यांचे पथक कार्यरत आहेत. (Hingoli)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community