मुंबईत Hit and Run; पहाटे गणेश मंडळ कार्यकर्त्यांना धडक देऊन बीएमडब्लूचा चालक पळाला  

काही आठवड्यांपूर्वी मुंबईतील वरळी परिसरातही अशीच हिट अँड रनची (Hit and Run) घटना घडली होती.

169

मुंबईतील मुलुंड परिसरात शनिवार, पहाटे ४ वाजता एका बीएमडब्ल्यू कार चालकाने रस्त्यावर बॅनर लावणाऱ्या दोन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना धडक देत पळ काढला. या घटनेत एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला असून दुसऱ्याची परिस्थिती गंभीर आहे. गंभीर जखमी असलेल्या तरुणावर सध्या उपचार सुरू आहेत.

(हेही वाचा Ujani Dam : उजनीच्या 283 कोटींच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याला शिखर समितीची मान्यता)

एका कार्यकर्त्याचा मृत्यू 

मुलुंडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाच्या मंडपाजवळ प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे कार्यकर्ते पहाटे ४ वाजताच्या दरम्यान आकृती टॉवर जवळ बॅनर लावत होते. अचानक कॅम्पस हॉटेलकडून भरधाव वेगाने आलेल्या बीएमडब्ल्यूने या दोघांना धडक दिली. धडक देऊन (Hit and Run) कारचालक पसार झाला. या अपघातात प्रीतम थोरात याचा मृत्यू झाला असून प्रसाद पाटीलची प्रकृती गंभीर आहे. घटनास्थळी नवघर पोलीस दाखल झाले असून कार चालकाचा शोध सुरू आहे. दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी मुंबईतील वरळी परिसरातही अशीच हिट अँड रनची (Hit and Run) घटना घडली होती. त्या घटनेत एका कारचालकाने महिलेला फरफटत नेत पळ काढला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडल्याने सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.