- प्रतिनिधी
ठाण्यातील तीन हात नाका येथे भरधाव वाहनाच्या धडकेत पीटीआय या वृत्तसंस्थेचे पत्रकार आशिष आगाशे यांच्या मातोश्री पुष्पश्री आगाशे (७३) यांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडला. अज्ञात वाहन चालकाने धडक दिल्यानंतर तेथून पळ काढला आहे. अपघात स्थळावरील सीसीटीव्ही तपासण्यात येणे असून वाहन चालकाचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी दिली आहे. तसेच सद्यस्थिती अपघाती मृत्यूची नोंद केली करण्यात आली असून नातेवाईकांचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्याची तरतुद ठेवण्यात आली असल्याची माहिती महाजन यांनी दिली आहे. (Hit and Run)
(हेही वाचा – राज्यात आदर्श आदिवासी गाव, स्वतंत्र आदिवासी विद्यापीठ उभारणार; राज्यपाल C. P. Radhakrishnan यांची घोषणा)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुष्पश्री श्रीपाद आगाशे (७३) ह्या तीन हात नाका येथील मनोरुग्णालया जवळील रोशनी कॉम्प्लेक्समध्ये राहण्यास होत्या. गुरुवारी सकाळी त्या ६.४० वाजता दूध आणण्यासाठी घराबाहेर पडल्या. दुकानातून दूध घेतल्यानंतर त्या घरी परतत होत्या. दरम्यान मुंबईच्या दिशेहून नाशिकच्या दिशेने निघालेल्या एका भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक देऊन वाहनासह तेथून पळ काढला. या भीषण अपघातात पुष्पश्री श्रीपाद आगाशे या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना सायन रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत झाल्याचे घोषित केले. घटनास्थळी दाखल झालेल्या नौपाडा पोलिसांनी अपघात स्थळावरील सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले असून अपघाताचे फुटेज तपासण्यात येत आहे अशी माहती नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी दिली आहे. तसेच सद्यस्थिती अपघाती मृत्यूची नोंद केली करण्यात आलेली आहे. नातेवाईकांचा जबाब नोंदवून लवकरच अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती महाजन यांनी दिली आहे. (Hit and Run)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community