Mumbai Police Hoax Call : हॉक्स कॉलने वाढवली मुंबई पोलिसांची डोकेदुखी

एका महिन्यात सात ते आठ निनावी कॉल

143
Spam Calls : स्पॅमिंग करणाऱ्या ५० संस्थांना टाकले काळ्या यादीत

मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात येणाऱ्या धमकीच्या निनावी कॉलमुळे (Mumbai Police Hoax Call) मुंबई पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. निनावी हॉक्स कॉलर मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला करून बॉम्ब ठेवण्यात आल्याचे तर कधी बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी देत असतात. या निनावी कॉलमुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागते, अखेरीस हे हॉक्स कॉल असल्याचे समोर येते. या प्रकारे एका महिन्यात पाच ते सहा हॉक्स कॉल पोलीस नियंत्रण कक्षाला येत असतात अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. मागील सात महिन्यात ३५ हॉक्स कॉलची पोलीस दफ्तरीत नोंद झाली आहे.

(हेही वाचा – BMC : महापालिकेत बायोमेट्रिक हजेरी मशिन्स होणार हद्दपार, हजेरी नोंदणीसाठी ‘या’ मशिन्सवर देणार भर)

मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला येणाऱ्या प्रत्येक निनावी कॉलची पोलिसांकडून खात्री करण्यात येते. शेवटी हा हॉक्स कॉल (Mumbai Police Hoax Call) असल्याचे समोर येते. एका निनावी कॉलमुळे संपूर्ण पोलीस यंत्रणांची मात्र चांगलीच दमछाक होते. हे निनावी हॉक्स कॉलची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. २०२१ मध्ये १८ हॉक्स कॉल मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला प्राप्त झाले होते. तर २०२२ मध्ये ही संख्या १५ वर आली, २०२३ मध्ये ही संख्या पुन्हा वाढली. २०२४ मध्ये ही संख्या वाढली असून मागील ७ महिन्यात ३५ हॉक्स कॉल पोलीस नियंत्रण कक्षाला आले होते.

हे निनावी हॉक्स कॉल (Mumbai Police Hoax Call) करणारे मनोरुग्ण, मद्यपी असल्याचे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झालेले आहे. वेड्याच्या भरात किंवा नशेच्या अंमलात मुख्य नियंत्रण कक्षाला कॉल करून अमुक ठिकाणी बॉम्ब स्फोट होणार आहे, तर तमुक ठिकाणी बॉम्ब पेरण्यात आले आहे, तर कधी शहरात अतिरेकी घुसले असल्याची खोटी माहिती कॉल वरून दिली जाते. पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला मागील सात महिन्यात २८ बॉम्ब ठेवल्याचे धमकीचे कॉल आले होते. तसेच मुंबई दहशत निर्माण करणारे पाच ई-मेल आणि सोशल मीडियाद्वारे दोन वेळा मुंबई शहरात बॉम्ब ठेवल्याची खोटी माहिती देण्यात आली होती.

(हेही वाचा – प्रकाश आंबेडकरांचं खळबळजनक विधान; म्हणाले, Raj Thackeray वर…  )

मुंबई गुन्हे विभागाच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाने (सीआययु) तपास करून संबंधित अज्ञात कॉलर्स शोध घेतला असता त्यात या अज्ञात कॉलर्समध्ये तीन मनोरुग्ण तर दोघांनी दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे आढळून आले. तसेच दोन लहान मुलांनी हे अजाणतेपणे कृत्य केल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचप्रमाणे जाणूनबुजून कॉल (Mumbai Police Hoax Call) करून मुंबई शहरात दहशत पसरवणाऱ्या दोघांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. १५ प्रकरणांमध्ये प्रतिबंधात्मक कारवाई आणि तपास अद्याप सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, अशा प्रकरणांकडे कानाडोळाही करता येत नाही. त्यामुळे सर्व प्रकरणांची तपासणी करण्यात येते. त्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागते. खूप प्रयत्न करूनही धमकी अथवा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीला अटकही होते. अशा प्रकरणांसाठी विशेष कायदा नाही. परिणामी, अशा प्रकरणांमध्ये आरोपीला लवकर जामीन मिळतो. त्यामुळे या प्रकरणासाठी कठोर कायदा करण्याची आवश्यकता आहे. नियंत्रण कक्षात निनावी कॉल (Mumbai Police Hoax Call) आल्यानंतर बॉम्ब शोधक व श्वान पथकासह सर्व यंत्रणांना याची माहिती दिली जाऊन तपासणी केली जाते. कॉल खोटा असल्याची खात्री होत नाही तोपर्यंत शेकडो मनुष्यबळ कामाला लागते, त्यानंतर कॉलरचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणेवर ताण वाढतो. वाढत्या निनावी हॉक्स कॉलमुळे तपास यंत्रणेवर ताण येत असून पोलिसांची डोकेदुखी देखील वाढली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.