युट्युब, सोशल माध्यमातुन देशात सुरू असणारे मानवी तस्करीचे रॅकेट सीबीआयने (CBI) उध्वस्त केले आहे. (CBI Busts Major Human Trafficking Networks) देशातील तरुणांना परदेशात नोकरीचे आमिष दाखवुन रशिया या देशात मृत्यूच्या दाढेत लोटले जात होते. मानवी तस्करीचे हे सर्वात मोठे जाळे देशातील दिल्ली, त्रिवेंद्रम, मुंबई, अंबाला, चंदीगड, मदुराई आणि चेन्नई या शहरांमध्ये पसरले होते. (Searches underway at more than 10 locations in 07 Cities: Delhi, Trivandrum, Mumbai, Ambala, Chandigarh, Madurai and Chennai) सीबीआयने (CBI) या शहरातील १३ ठिकाणी एकाच वेळी शोध मोहीम घेऊन रशिया या देशात तरुणांना मृत्युच्या दाढेत पाठवणाऱ्या ४ रिक्रुटमेंट कंपन्यांची पोलखोल करण्यात आली आहे. (Human Trafficking Racket)
मेसर्स २४×७ आरएएस ओव्हरसीज फाउंडेशन, केजी मार्ग, नवी दिल्ली, मेसर्स ओएसडी ब्रदर्स ट्रॅव्हल्स अँड व्हिसा सर्व्हिस प्रा. लिमिटेड मुंबई (O.S.D Bros Travels & Visa Services Pvt Ltd) मुंबई, मेसर्स ॲडव्हेंचर व्हिसा सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, चंदीगड, पंजाब, बाबा व्लॉग्स ओव्हरसीज रिक्रूटमेंट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, दुबई या कंपन्यांच्या समावेश आहे. सुयश मुकुट, राकेश पांडे, मनजीत सिंग आणि फैसल अब्दुल मुतालिब खान उर्फ बाबा हे या कंपन्यांचे संचालक आहेत. या कंपन्या परदेशात किफायतशीर नोकऱ्या देण्याच्या नावाखाली भारतीय तरुणांना लक्ष्य करून देशभरात मानवी तस्करीचे मोठे नेटवर्क चालवत होते. हे तस्कर एक संघटित नेटवर्क म्हणून कार्यरत आहेत आणि ते भारतीय नागरिकांना युट्युब इत्यादी सोशल मीडिया चॅनेलद्वारे तसेच त्यांच्या स्थानिक संपर्क आणि एजंटद्वारे रशियामध्ये उच्च पगाराच्या नोकऱ्यांसाठी आमिष दाखवत होते. (Human Trafficking Racket)
(हेही वाचा – Board Exam Paper Checking : पेपर तपासणी थांबल्यास मुख्याध्यापक जबाबदार)
जवळपास ३५ प्रकरणे समोर
त्यानंतर, तस्करी झालेल्या भारतीय नागरिकांना युद्धाच्या भूमिकेत प्रशिक्षण देऊन त्यांच्या इच्छेविरुद्ध रशिया-युक्रेन युद्ध क्षेत्रामध्ये युध्द भूमीवर तैनात करण्यात येत होते. अनेक तरुण या मानवी तस्करीच्या जाळ्यात अडकले होते व त्यांनी आपले आयुष्य धोक्यात घातले, युद्धभूमीवर अनेक भारतीय तरुणांचा बळी देखील गेला असून अनेक तरुण गंभीर जखमी झाल्याचे आढळून आले आहे. उत्तम रोजगार आणि उच्च पगाराच्या नोकऱ्यांच्या नावाखाली रशियाला भारतीय नागरिकांची तस्करी करताना आढळून आलेल्या कंपन्यावर या प्रकरणी सीबीआयने (CBI) खाजगी व्हिसा कन्सल्टन्सी फर्म आणि एजंट आणि इतरांविरुद्ध मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Case registered against various Visa Consultancy Firms and Agents on allegations of hiring, sending youths to Russia-Ukraine war zone in the guise of lucrative jobs)
सीबीआय दिल्ली, त्रिवेंद्रम, मुंबई, अंबाला, चंदीगड, मदुराई आणि चेन्नई येथे जवळपास १३ ठिकाणी एकाचवेळी शोध घेत आहे. आतापर्यंत रोख रक्कम ५० लाख, लॅपटॉप, मोबाईल, डेस्कटॉप, सीसीटीव्ही फुटेज आदी गुन्ह्यांची कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड जप्त करण्यात आले आहेत. (So far over Rs. 50 lakhs, incriminating documents, electronic records like laptops, mobiles, desktops etc. seized) तसेच काही संशयितांना विविध ठिकाणांहून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. (Certain suspects detained for questioning at various locations) आतापर्यंत परदेशात पाठवलेल्या भारतीय तरुणाची जवळपास ३५ प्रकरणे समोर आले आहेत. (So far around 35 instances of victims sent abroad established) तस्करीत बळी पडलेल्याची ओळख पटवली जात आहे. या प्रकरणी सीबीआयकडून (CBI) तपास सुरू आहे. संशयास्पद रिक्रूटमेंट एजन्सी आणि एजंट्सच्या नोकऱ्यांच्या अशा खोट्या आश्वासनांना बळी पडू नये, असे आवाहन सर्वसामान्यांना करण्यात आले आहे. (Human Trafficking Racket)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community