Human Trafficking Suspicion: दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या ४ कर्मचाऱ्यांना अटक, मानवी तस्करीप्रकरणी सुरक्षा दलाच्या जवानांना संशय

161
Human Trafficking Suspicion: दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या ४ कर्मचाऱ्यांना अटक, मानवी तस्करीप्रकरणी सुरक्षा दलाच्या जवानांना संशय
Human Trafficking Suspicion: दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या ४ कर्मचाऱ्यांना अटक, मानवी तस्करीप्रकरणी सुरक्षा दलाच्या जवानांना संशय

दिल्लीतील इंदिरा गांधी इंटरनॅशनल विमानतळावरून एअर इंडियाचे ४ कर्मचारी आणि एका भारतीय प्रवाशाला अटक करण्यात आली. हे प्रवासी ब्रिटनला उड्डाण करणाऱ्या विमानात चढण्याचा प्रयत्न करत होते. ही घटना बुधवारी (२७ डिसेंबर) घडली. मानवी तस्करी रॅकेटमध्ये (Human Trafficking Suspicion) सहभागी असल्याचा संशय केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सी. आय. एस. एफ.) जवानांना प्रवाशांच्या संशयास्पद हालचालींमुळे आला. या संशयाखाली त्यांना अटक करण्यात आली.

ब्रिटनला जाणाऱ्या विमानातील दिलजोत सिंग या प्रवाशाची प्रवासी कागदपत्रे इमिग्रेशन अधिकाऱ्यांना संशयास्पद वाटली. यामुळे त्यांना त्याला विमानात चढण्यास नकार दिला. या प्रवाशाला विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे कागदपत्रांबाबत खुलासा करावा, असे निर्देष देण्यात आले. यामुळे सिंग यांनी एअर लाईन्सच्या कर्मचाऱ्यांना संपर्क साधला. त्यांनी AISATS च्या कर्मचाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली आणि मदत मागितली, मात्र यामुळे सिंग यांच्या कागदपत्रे छाननी प्रक्रियेला वेगा आला तसेच रोहन वर्मा, मोहम्मद जहांगीर, यश आणि अक्षय नारंग या कर्मचाऱ्यांसह सिंह यांना दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Ind vs Pak Davis Cup Tie : भारत पाकविरुद्धचा सामना सोडण्याची शक्यता )

सिंग यांच्या संशयास्पद वर्तनामुळे सतर्क झालेल्या सीआयएसएफने दिल्ली विमानतळ प्राधिकरणाच्या सहकार्याने एअर इंडिया कर्मचारी आणि प्रवाशाच्या शोधाबाबत मोहीम सुरू केली. त्यावेळी सी. सी. टी. व्ही. फुटेजमध्ये क्रू चेक-इन काउंटरवरील ए. आय. एस. ए. टी. एस. चे कर्मचारी चुकीच्या किंवा अवैध कागदपत्रांचा वापर करून सिंग आणि इतर दोघांची बोर्डिंग प्रक्रिया सुलभ करत असल्याचे दिसून आले.

मानवी तस्करी हाणून पाडण्यासाठी प्रयत्न सुरू

या घटनेबाबत एआयएसएटीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गुप्ता म्हणाले की, दिल्ली विमानतळ प्राधिकरण आणि सीआयएसएफच्या सहकार्याने मानवी तस्करीचा प्रयत्न हाणून पाडण्याबाबत कारवाई सुरू आहे. ३ व्यक्तींनी बेकायदेशीरपणे स्थलांतर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यापैकी एकाला कारवाईदरम्यान अटक करण्यात आली. त्यानंतर, बेकायदेशीर कृत्यांना पाठिंबा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले तसेच पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला त्वरित दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ते पुढे म्हणाले की, कामकाजात अखंडता सुरक्षितता, कायदेशीरता आणि नैतिक वर्तनाची सर्वोच्च मानके कायम ठेवण्यासाठी एअर इंडिया (Air India SATS Airport Services Private Limited) वचनबद्ध आहे. टाटाच्या मालकीची एअर इंडिया आणि एसएटीएस लिमिटेड यांच्यातील संयुक्त उपक्रम, एआयएसएटीएसकडून विमान देखभालीसह, सामान हाताळणी इत्यादी विविध सेवा पुरवल्या जातात. या आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या आणखी एका घटनेनंतरच ही घटना घडली. निकारागुआला जाणाऱ्या 276 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या चार्टर जेट विमानाला मानवी तस्करीच्या संशयावरून फ्रान्समध्ये चार दिवसांसाठी उतरवण्यात आले होते. या विमानातील दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले, तर २५ प्रवाशांनी आश्रयासाठी अर्ज केला आणि ते मागे राहिले. उर्वरितांनी मंगळवारी मुंबईला पुन्हा उड्डाण केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.