धारावीत भररस्त्यात पत्नीसमोर पतीची सपासप वार करून हत्या; आरोपी फरार

husband brutally murdered in front of his wife in dharavi
धारावीत भररस्त्यात पत्नीसमोर पतीची सपासप वार करून हत्या; आरोपी फरार

मुंबईतील धारावीमध्ये मंगळवारी रात्री एका व्यक्तीची भररस्त्यात त्याच्या पत्नी समोर हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री ९ वाजता घडलेल्या या घटनेदरम्यान मृत पती आपल्या पत्नीसोबत बाहेर जात होता. पोलिसांच्या माहितीनुसार, घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव जाहिद असून तो सुरक्षा रक्षकाचे काम करत होता. या हल्ल्याच्या दरम्यान जाहिदला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना पत्नी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेतील २ अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.

माहितीनुसार, पती आणि पत्नी बाहेर जात असताना आरोपींनी पती जाहिदवर चाकूने सपासप वार केले आणि तो गंभीररित्या जखमी झाला. यादरम्यान त्याच्या पत्नीने त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तिच्यावरही हल्ला केला आणि ती गंभीर जखमी झाली आहे. ही घटना घडताच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर जाहिदला सायन रुग्णालयात तात्काळ नेण्यात आले, मात्र डॉक्टरांची त्याला मृत घोषित केले. मृत जाहिद आणि हल्लेखोरांमध्ये परस्पर वैमनस्य असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

ज्या ठिकाणी धारावीत ही निर्घुण हत्या करण्यात आली, तो अतिशय गजबजलेला परिसर आहे. जाहिदवर ज्या ठिकाणी हल्ला करण्यात झाला ते ठिकाण धारावी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे या घटनेनंतर पोलिसांवरही प्रश्न उपस्थित केला जात आहे. माहितीनुसार, हल्लेखोरांविरोधात कलम ३०२, ३२४, ३३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

(हेही वाचा – मुंबईतल्या व्यापाऱ्यांकडून वसूल केलेली खंडणी थेट पाकमध्ये छोट्या शकीलच्या खिशात)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here