आयआयटीचा विद्यार्थीही Digital Arrest चा बळी; ७ लाखांची फसवणूक

30
आयआयटीचा विद्यार्थीही Digital Arrest चा बळी; ७ लाखांची फसवणूक
आयआयटीचा विद्यार्थीही Digital Arrest चा बळी; ७ लाखांची फसवणूक

मोबाइल नंबरवर बेकायदेशीर गुन्ह्यांच्या १७ तक्रारी नोंदवण्यात आल्याची भीती दाखवत आयआयटीच्या (IIT Bombay) एका विद्यार्थ्याची ७.२९ लाख रूपयांनी फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) चा कर्मचारी असल्याचे सांगत या विद्यार्थ्याला डिजिटल अटक (Digital Arrest) करण्यात आली आणि त्याला धमकी देऊन 7.29 लाख रुपयांना गंडा घातला.

(हेही वाचा – Digital Arrest : डिजिटल अरेस्ट किंवा आधार घोटाळे रोखण्यासाठी ‘हे’ उपाय नक्की करा)

25 वर्षीय विद्यार्थ्याने सांगितले की, एका अनोळखी नंबरवरून कॉल आला होता. कॉलरने स्वत:ची ओळख ट्राय कर्मचारी म्हणून करून दिली मोबाईल नंबर बंद होण्यापासून रोखण्यासाठी त्याला पोलिसांकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घ्यावे लागेल. तसेच तो कॉल सायबर क्राइम ब्रँचला ट्रान्सफर करत असल्याचेही सांगितले. यानंतर व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलवर एक व्यक्ती पोलिस अधिकाऱ्याच्या ड्रेसमध्ये दिसला. त्याने पीडितेचा आधार क्रमांक मागितला आणि मनी लाँड्रिंगमध्ये गुंतल्याचा आरोप केला. त्याने विद्यार्थ्याला यूपीआयद्वारे २९,५०० रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

घोटाळेबाजांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन करून पैशांची मागणी केली. यावेळी पीडितेने आपले बँक तपशील शेअर केले, ज्यामुळे फसवणूक करणाऱ्यांनी त्याच्या खात्यातून ७ लाख रुपये काढून घेतले. निर्दोष असतांना करीयर संपेल, या भीतीने विद्यार्थ्याने भामट्यांना प्रतिसाद दिला. नंतर मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसांशी संपर्क साधून अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. (Digital Arrest)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.