IIT Student ISIS : आयआयटीचा विद्यार्थी तौसिफ अल फारूकी ISIS च्या संपर्कात; वसतीगृहात सापडला इसिसचा झेंडा

IIT Student ISIS : गुवाहाटीपासून सुमारे ३० किमी अंतर असलेल्या हाजो परिसरातून तौफिक अल फारूकी याला पकडले. विद्यार्थ्याच्या वसतिगृहाच्या खोलीत आयएसआयएससारखाच एक झेंडा सापडला आहे.

212
IIT Student ISIS : आयआयटीचा विद्यार्थी तौसिफ अल फारूकी ISIS च्या संपर्कात; वसतीगृहात सापडला इसिसचा झेंडा
IIT Student ISIS : आयआयटीचा विद्यार्थी तौसिफ अल फारूकी ISIS च्या संपर्कात; वसतीगृहात सापडला इसिसचा झेंडा

आयएसआयएस इंडियाचा प्रमुख हरिश फारुकी उर्फ हरिश अजमल फारुकी आणि त्याचा सहकारी अनुराग सिंग उर्फ रेहान यांना धउबरी जिल्ह्यातून अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर चारच दिवसांनी आयआयटी गुवाहाटीच्या एका विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले. २३ मार्च रोजी सायंकाळी आसाम पोलिसांनी इसिस या दहशतवादी गटात सामील होण्यासाठी निघालेला तौसिफ अल फारूकी (Touseef Ali Farooqui) या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले. (IIT Student ISIS)

(हेही वाचा – Maharashtra Bhavan: महाराष्ट्र भवनावर टीका करणाऱ्या ओमर अब्दुल्लांचा करण्यात आला निषेध)

वसतीगृहात सापडला इसिसचा झेंडा

फरार विद्यार्थ्याला शोधण्यासाठी पोलिसांनी स्थानिकांची मदत घेतली. तपासातून शनिवारी सायंकाळी गुवाहाटीपासून सुमारे ३० किमी अंतर असलेल्या हाजो परिसरातून त्याला पकडले. विद्यार्थ्याच्या वसतिगृहाच्या खोलीत आयएसआयएससारखाच एक झेंडा सापडला आहे. तो झेंडा विशेष यंत्रणांकडे पडताळणीकरता पाठवण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. “आम्ही जप्त केलेल्या वस्तू तपासत आहोत. आम्ही ईमेल पाठवण्याच्या हेतूची चौकशी करत आहोत. विद्यार्थ्याने काही तपशील दिले आहेत, परंतु आम्ही आता आणखी काही उघड करू शकत नाही”, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक कुमार पाठक पुढे म्हणाले.

“आयएसआयएसचे समर्थन करणाऱ्या एका विद्यार्थ्याला आयएसआयएसमध्ये सामील होण्याआधीच ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील कायदेशीर पाठपुरावा केला जाईल”, असे पोलीस महासंचालक जी.पी सिंग यांनी एक्सवर पोस्ट केले आहे.

ईमेलच्या हेतूची पडताळणी चालू

अतिरिक्त पोलीस अधीक्षक कुमार पाठक म्हणाले, “याविषयी संबंधित विद्यार्थ्यानेच पोलिसांना ईमेल केला होता. या ईमेलमध्ये त्याने आयएसआयएसमध्ये सहभागी होत असल्याचे सांगितले. हा ईमेल मिळताच पोलिसांनी तपास चालू केला. त्यानंतर त्यांनी आयआयटी गुवाहाटीच्या प्रशासनाशी संपर्क साधला. तोपर्यंत संबंधित विद्यार्थी बेपत्ता झाला होता. त्याचा मोबाईलही बंद लागत होता. प्राथमिक चौकशीनंतर त्याला एसटीएफ कार्यालयात आणण्यात आले आहे. आम्ही ईमेलच्या हेतूची पडताळणी करत आहोत.” (IIT Student ISIS)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.