२०२४ या सरत्या वर्षात लाचलुचपत विभागाने (ACB) आपली भूमिका चोखपणे बजावत ९७७ लाचखोरांविरोधात राज्यात ६६७ गुन्हे दाखल केले, तर अपसंपदा प्रकरणी ३० गुन्हे आणि अन्य भ्रष्टाचार ०७ गुन्हे असे एकूण ७०४ गुन्हे १०६९ लाचखोरांवर सात विभागात दाखल केले. लाच घेणाऱ्यांमध्ये २९ अधिकारी क्लास वन, तर क्लास टूचे २८ आणि क्लास थ्रीच्या १०५ जणांचा समावेश आहे. (Illegal Assets)
(हेही वाचा – आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ आणि माजी पंतप्रधान Manmohan Singh यांची अशी आहे कारकीर्द)
यामध्ये क्लास वन अधिकाऱ्यांपासून ते शिपायापर्यंत ६० लाचखोरांनी वेगवेगळ्या मार्गाने ३१६ कोटी ८६ लाख ५१ हजार ४०१ रुपयांची बेकादेशीर मालमत्ता जमवल्याचे लाचलुचपत विभागाच्या तपासात समोर आले आहे. वर्षभरात ६६७ लाचखोरांनी ३ कोटी १५ लाख ८९ हजार ४१० रुपयांची लाचखोरी केली. त्यांना या प्रकरणात अटक झाली. मात्र अद्याप १७० लाचखोरांवर निलंबनाची कारवाई झाली नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. निलंबन न केलेल्या सर्वाधिक लाचखोरांमध्ये ४० अधिकारी, कर्मचारी हे शिक्षण आणि क्रीडा विभागाचे आहेत.
या लाचखोरापैकी सापळा लावून लाच घेतांना रंगेहात पकडलेल्यांची संख्या ६६७ एवढी आहे. त्यामध्ये क्लास वन ६२, क्लास टू १००, क्लास थ्री ५००, क्लास फोर ४७ आणि या लाचखोरांचे १०३ पंटर यांचा समावेश आहे. वर्षभरात या लाचखोरांनी ३ कोटी १५ लाख ८९ हजार ४१० रुपयांची लाच घेतली. वेगवेगळ्या मार्गाने ३१६ कोटी ८६ लाख ५१ हजार ४०१ रुपयांची मालमत्ता जमविल्याच्या प्रकरणी ६० जणांवर गुन्हे दाखल झाले. त्यामध्ये क्लासवन लाचखोरांची मालमत्ता ९ कोटी ५६ लाख ६६ हजार ७३६, क्लास टू – ३ कोटी ५१ लाख ६८ हजार २१५, क्लास थ्री – ३ कोटी २३ लाख १ हजार ५७७, तर इतर लोकसेवक यांची १५३ कोटी ७२ लाख २८ हजार ५७६ रुपयांची मालमत्ता उत्पन्नापेक्षा अधिकची असल्याचे लाचलुचपत विभागाच्या तपासात समोर आले आहे.
लाचखोरीत आघाडीवर असलेले विभाग
विभाग गुन्हे
• महसूल १७७
• पोलीस १३३
• महावितरण ४०
• झेडपी ४०
• पंचायत समिती ६०
• शिक्षण विभाग ३७ (Illegal Assets)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community