Illegal liquor : महाशिवरात्रीनिमित्त सालबर्डी येथे भरणाऱ्या यात्रेच्या अनुषंगाने खबरदारीची उपाययोजना म्हणून महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील (Maharashtra-Madhya Pradesh border) नदीपात्रालगतच्या गावठी दारू अड्ड्यांवर धाड टाकून ते उद्ध्वस्त करण्यात आले. अमरावती ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा व मध्य प्रदेश पोलिसांच्या वतीने ही संयुक्त कारवाई सोमवारी २४ फेब्रुवारीला करण्यात आली. या कारवाईत २७ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला. (Illegal liquor)
महाशिवरात्री उत्सवानिमित्त (Mahashivratri festival) मोर्शी ठाण्याची हद्द व मध्य प्रदेश सीमेवर असलेल्या सालबर्डी (Salbardi) येथे यात्रा भरते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, मोर्शी ठाण्यातील डीबी पथक आणि मध्य प्रदेशातील मुलताई ठाण्यांतर्गत मासोद चौकी येथील पथकाने संयुक्तरीत्या सोमवारी सकाळी सीमेवरील घोडदेव, झुनकारी, पांढरघाटी व रोहणा शिवारातील नदीपात्रालगत उभारण्यात आलेल्या दहा गावठी दारू अड्यांवर धाड (liquor stores Raids) टाकून ते उद्ध्वस्त केले.
(हेही वाचा – नवीन शैक्षणिक वर्षापासून स्कूल बसेससाठी नवे धोरण लागू करणार; Minister Pratap Sarnaik यांचे निर्देश)
या कारवाईत २०० लिटर क्षमतेचे ८३ प्लास्टिक ड्रममधील १६ हजार ६०० लिटर मोह सडवा, ७० लिटर क्षमतेच्या १५ ट्यूबमधील गावठी दारू (Liquor), २०० लिटर क्षमतेचे ८३ प्लास्टिक ड्रम आणि सिमेंटच्या टाक्यामधील ८ हजार ५०० लिटर मोह सडवा असा एकूण २७ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे (Kiran Wankhade), पीएसआय सागर हटवार व त्यांचे पथक तसेच मोर्शी व मुलताई ठाण्यांतर्गत मासोद चौकी येथील कर्मचारी यांनी केली.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community