Baba Siddiqi Murder प्रकरणात पाकिस्तान कनेक्शन समोर! ड्रोनच्या सहाय्याने शस्त्र आली भारतात?

78
Baba Siddiqi Murder प्रकरणात पाकिस्तान कनेक्शन समोर! ड्रोनच्या सहाय्याने शस्त्र आली भारतात?
Baba Siddiqi Murder प्रकरणात पाकिस्तान कनेक्शन समोर! ड्रोनच्या सहाय्याने शस्त्र आली भारतात?

बाबा सिद्दिकी (Baba Siddiqi Murder) यांची १२ ॲाक्टोबरला वांद्रे परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आतापर्यंत १४ आरोपींना अटक केली असून, गोळ्या झाडणारा शिवकुमार गौतम, झिशान अख्तर आणि शुभम लोणकर (Shubham Lonkar) हे अद्याप फरार आहेत. दोन वेगवेगळ्या टोळ्यांच्या गटांना हत्येची सुपारी देण्यात आली होती. सिद्दिकी (Baba Siddiqi Murder) मोठी व्यक्ती असल्याने त्यांच्या हत्येने खळबळ उडण्याची धोका असल्याने तसेच पैसे कमी दिल्याने एका गटाने माघार घेतली आणि दुसऱ्या गट तयार करून हत्याकांड घडवण्यात आले.

भारतात कशी आली शस्त्रं ?
या शूट आऊट केसमध्ये आता पाकिस्तान (Pakistan) कनेक्शन समोर आलं आहे. क्राईम ब्रांचच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधून ड्रोनच्या सहाय्याने भारतात ही शस्त्र पाठवण्यात आली होती. त्यामध्ये तीन विदेशी तर एका देशी पिस्तुलाचा समावेश आहे. बाबा सिद्दीकी गोळीबार प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेने आणखी एक खुलासा केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईत तस्करी करण्यात आलेली तीन विदेशी पिस्तुलं भारताच्या सीमेवर ड्रोनद्वारे पोहोचवली गेली होती आणि नंतर हँडलर्सद्वारे मुंबईत पाठवली गेली. (Baba Siddiqi Murder)

झिशान आणि शुभम लोणकर यांना अटक होण महत्वाचं का?
हँडलर्समार्फत शस्त्रे मुंबईत पाठवल्यानंतर बाबा सिद्दीकी यांच्यावर 3 विदेशी पिस्तुल आणि एका देशी पिस्तुलाने हल्ला करण्यात आला. मात्र, विदेशी पिस्तुलांवर भारतात बंदी असताना ती भारतात आलीच कशी? असा प्रश्न आता बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर उपस्थित होत आहे. ड्रोनद्वारे ही शस्त्र पाकिस्तानातून राजस्थान किंवा पंजाब बॉर्डरवर मागवण्यात आली असावीत असा क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांना संशय आहे. बिश्नोई गँगपर्यंत ही शस्त्र पोहोचवण्यात पाकिस्तानी गँग किंवा ISI चाही हात असू शकतो. मात्र याचा खुलासा होण्यासाठी झिशान आणि शुभम लोणकर यांना अटक होण तितकंच महत्वाचं आहे. पण सध्या ते दोघेही फरार असून पोलिसांकडून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनी राजस्थान तसेच पंजाब पोलिसांनाही या पिस्तुलांचे फोटो पाठवले आहेत, जेणेकरून अशा कारवायांमध्ये कोणी हिस्ट्री शुटर्स असतील तर त्यांची ओळख पटवता येईल. अशी माहितीही समोर आली आहे. (Baba Siddiqi Murder)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.