महिन्याला २५ ते ३० हजार रुपयांचा पगार घेणाऱ्या एका खाजगी कंपनीच्या दुकानदाराला ला आयकर विभागाने नोटीस पाठवून त्याला धक्काच दिला, ४६ लाख रुपयांचा ‘आयकर’ भरण्यासाठीची ही नोटीस Income Tax Department Notice होती.आयकर विभागात जाऊन चौकशी केल्यानंतर धक्का दायक बाब उघडकीस आली.
या दुकानदाराच्या कागदपत्राचा वापर करून एका सहकारी बँकेत दोन करंट खाते उघडून त्या खात्यावरून ट्रेंडिंग करणाऱ्या दोन कंपन्यांमध्ये ४२ कोटींचा व्यवहार करण्यात आल्याचे उघडकीस आले या प्रकरणी ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर पोलीस ठाण्यात या कंपन्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका खाजगी कंपनीत दुकानदार म्हणून काम करणार्या ४२ वर्षीय उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला आयटी विभागाची नोटिस २२ मे रोजी मिळाली होती, त्यात त्याला ४६ लाख रुपये आयकर भरण्यासाठी सांगण्यात आले होते. महिन्याला २५ ते ३० हजार रुपये पगार घेणारा तसेच कुठलाही जोड व्यवसाय नसणाऱ्या व्यक्तीला एवढ्या मोठ्या रकमेची आयकर विभागाची नोटीस प्राप्त झाल्यामुळे त्याला धक्काच बसला.
हेही वाचा :ADR Report : अब्जाधीशांमध्ये सर्वाधिक खासदार भाजपचे)
नेमके प्रकरण काय?
त्या व्यक्तीने आयटी विभागाकडे चौकशी केली आणि असे आढळले की उल्हासनगरमधील एका सहकारी बँकेत त्याचे पॅन, आधार आणि इतर वैयक्तिक तपशील वापरून दोन चालू (करंट)खाती उघडण्यात आली होती. ‘हरी ओम टेक्सटाइल्स’ आणि ‘तुलसी ट्रेडर्स’ नावाच्या दोन ट्रेडिंग कंपन्या त्या व्यक्तीच्या ओळखपत्रांचा वापर करून सुरू करण्यात आलेल्या होत्या आणि त्या कंपन्यांच्या नावे चालू खाती उघडण्यात आली होती. २०१४ ते २०१७ कालावधीत दोन चालू खात्यांमधून ४१.९१ कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.
या व्यक्तीने याप्रकरणी १४ ऑगस्ट रोजी उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानंतर भारतीय दंड संहितेच्या कलमां खाली फसवणूक, गुन्हेगारी कट आणि बनावटगिरी यांसारख्या गुन्ह्यांसह गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community