२६३ कोटी टीडीएस घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांसह तीन जणांना अटक केली. या तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिघांना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्याने दिली. आयकर अधिकारी तानाजी मंडल आणि त्यांचे सहकारी भूषण पाटील आणि राजेश शेट्टी असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत आहेत, हे अधिकारी मुंबईतील आयकर विभागाच्या कार्यालयात नियुक्त असताना त्यांनी २६३ कोटी रुपयांचा बनावट टीडीए परतावा तयार केल्याचा या तिघांवर आरोप आहे.
केंद्रीय अन्वेषण विभागाने बनावट टीडीएस प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारावर ईडीने तपास सुरु करून मणी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल केला होता. ईडीच्या तपासात टीडीएसचा तब्बल २६३ कोटींचा घोटाळा समोर आला होता. २००७-०८ या वर्षांच्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये बनावट टीडीएस परतावा करण्यात आला होता. भूषण अनंत पाटील यांची मालकी असलेल्या मेसर्स एसबी एंटरप्रायझेसच्या खात्यांसह ते विविध बँक खात्यांमध्ये २६३ कोटी रुपयांपेक्षा जास्त टीडीएस परतावा तयार करण्यात आणि हस्तांतरित केल्याचा आरोप आहे.
(हेही वाचा – ठाकरे गटाकडे मशाल राहणार की जाणार? सर्वोच्च न्यायालयात १७ जुलैला सुनावणी)
सीबीआयने या प्रकरणात आयकर अधिकारी पाटील, राजेश शांताराम शेट्टी आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपपत्र देखील दाखल केले होते. पीएमएलए अंतर्गत ईडीच्या तपासात असे दिसून आले की, १५ नोव्हेंबर २०१९ ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत अटक अधिकारी यांनी बनावट टीडीएसची रक्कम काही शेल कंपन्यांच्या खात्यावर वळत्या केल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी ईडीने तानाजी मंडल आणि त्यांचे इतर दोघे सहकारी यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने १० दिवसांची कोठडी सुनावली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community