आयकर विभागाने मंगळवारी, ११ एप्रिल रोजी मोठी कारवाई केली. त्यामध्ये गुजरात येथील वापी या भागात शाह पेपर मिलवर कारवाई केली.
नुकतेच हाती आलेल्या माहितीनुसार आयकर विभागाने गुजरातमधील वापी आणि मुंबईतील शाह पेपर मिल जवळील १८ जागांवर छापेमारी केली आहे. यामध्ये त्यांना २ करोड रोख रक्कम आणि तितक्याच रक्कमेचे दागिने हाती लागले आहेत. या कंपनीवर जवळपास ३५० करोड पेक्षा अधिक कर चोरीचा आरोप आहे. तसेच या कंपनीवर गेल्या ५ ते ६ वर्षांपासून गैर व्यवहार आणि कर चोरीचा आरोप आहे. आयकर विभागाचा तपास पूर्ण झाल्यावर योग्य रक्कम समोर येईल, अशी माहिती मिळत आहे.
(हेही वाचा “अतिक्रमण सोडाच पण सुईच्या टोकाएवढी जमीनही कुणी घेऊ शकणार नाही”, गृहमंत्र्यांनी चीनला खडसावले!)
Join Our WhatsApp Community