सोलापुरात आयकर विभागाने व्यावसायिकांच्या कार्यालयांवर छापे टाकल्याचे समोर आले आहे. गेल्या चार दिवसांत बीफ एक्सपोर्ट कंपनी, बांधकाम, भंगार, स्टील व्यावसायिकांवर छापे टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या छापेमारीत कोट्यावधींची बेहिशेबी संपत्ती मिळाली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार, सोमवार ते गुरुवार या गेल्या चार दिवसांत आयकर विभागाने सोलापुरातील आसरा चौक, कुमठा नाका, हैदराबाद रोड परिसरात छापेमारी केली आहे. या छापेमारीत ५० कोटींचा बेहिशेबी व्यवहार आढळून आले आहे. ही छापेमारी भंगार विक्रेत्यांवरती मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे.
आयकर विभागाला छापेमारी करताना भंगार विक्रेत्यांच्या रोखीने झालेला जो व्यवहार आहे आणि कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. भंगार विक्रेत्यांनी खरेदीची रक्कम कमी दाखवल्याचे हे अधिकाऱ्यांना लक्षात आले आहे. याआधी सोलापुरात अनेक ठिकाणी आयकर विभागाचे छापे पडले होते. आणि कोट्यावधींची संपत्ती जप्त केली आहे.
या ठिकाणी आतापर्यंत आयकर विभागाचे छापे
- सोलापुरातील मेहुल कन्स्ट्रक्शन
- सोलापुरातील अश्विनी रुग्णालय
- सोलापुरातील अश्विनी रुग्णालय, कुंभारी
- सोलापुरातील व्यावसायिक बिपीन पटेलांच्या निवासस्थान
- सोलापुरातील स्पंदन हार्ट केअर हॉस्पिटल
- सोलापुरातील डॉ. अनुपम शाह हार्ट क्लिनिक
- सोलापुरातील रघोजी किडनी आणि मल्टिस्पेशलिटी रुग्णालय
- पंढरपूरातील एक साखर कारखाना
(हेही वाचा – अखेर सदिच्छा साने प्रकरणाचे गूढ उकलले; हत्या करून मृतदेह समुद्रात फेकल्याची आरोपीची कबुली)
Join Our WhatsApp Community