देशाची राजधानी दिल्लीत शाळांना पुन्हा एकदा बॉम्बने (Delhi Schools Bomb Threat) उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. शाळांच्या इमारतीत अनेक बॉम्ब ठेवण्यात आले असून, पैशांची मागणी पूर्ण न झाल्यास त्यांचा स्फोट केला जाईल, असा ईमेल या शाळांना पाठवण्यात आला आहे. ईमेल पाठवणाऱ्याने ३० हजार डॉलर्सची (Dollars) मागणी केली आहे.
#WATCH | Delhi: Visuals from outside Mother Mary’s School in Mayur Vihar – one of the schools that received bomb threats, via e-mail
More than 40 schools received bomb threats via e-mail, in Delhi, today. pic.twitter.com/XrQHYhkP7x
— ANI (@ANI) December 9, 2024
खबरदारीचा उपाय म्हणून शाळा रिकामी करण्यात आल्या. गेल्या काही महिन्यांत शाळांना अशा धमक्या अनेकदा आल्या आहेत. मात्र त्यानंतर अफवा असल्याचे समोर आलं होतं. दिल्लीत सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आरके पुरमच्या डीपीएस, पश्चिम विहारच्या जीडी गोएंका स्कूल, मदर मेरी स्कूलसह ४० शाळा व्यवस्थापनांना बॉम्बची धमकी देणारा ईमेल आला होता. तोपर्यंत मुले त्यांच्या वर्गासाठी पोहोचली होती. (Delhi Schools Bomb Threat)
३०,००० डॉलर मिळाले नाहीत तर …
धमकीच्या मेलनंतर शाळा प्रशासनाने तात्काळ मुलांना घरी पाठवून पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दल (fire brigade) आणि दिल्ली पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. “मी शाळेच्या इमारतींमध्ये अनेक बॉम्ब पेरले आहेत. बॉम्ब लहान आणि अतिशय योग्य पद्धतीने लपवलेले आहेत. त्यामुळे इमारतीचे फारसे नुकसान होणार नाही, मात्र बॉम्बचा स्फोट झाल्यास अनेक जण जखमी होतील. जर मला ३०,००० डॉलर मिळाले नाहीत तर मी बॉम्बस्फोट करीन.” असं ईमेलमध्ये म्हटलं आहे. (Delhi Schools Bomb Threat)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community