स्वातंत्र्यदिनी देशात सर्वत्र तिरंगा ध्वज अभिमानाने फडकवला जात असताना उत्तरप्रदेशात मात्र त्याचा घोर अपमान करण्यात आल्याचे समोर आले आहे. उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे स्वातंत्र्यदिनीच मदरशात तिरंगा अंथरून त्यावर नाश्ता दिला गेल्याचे फोटो सोशल मिडियामध्ये व्हायरल झाल्याने देशप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे. ही घटना गौसिया इस्लामिया जिंतुल उलूम या मदरशात घडली आहे असे सांगितले जात आहे. होलागढ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हा भाग येतो. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी तिरंगा अंथरून त्यावरच नाश्ता दिला गेल्याचा फोटो पाहून स्थानिक देशप्रेमींनी आंदोलन केले. या वेळी आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांना पाचारण करण्यात आले. या ठिकाणी पोलीस आल्यानंतर त्यांनी आंदोलकांना कारवाईचे आश्वासन दिले.
(हेही वाचा – Tahawwur Rana : २६/११ दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा लवकरच भारतात येण्याची शक्यता; अमेरिकेने फेटाळून लावली रिट याचिका)
पोलिसांनी व्हायरल फोटोच्या आधारे मदरसा प्रमुखासह ४ जणांच्या विरोधात राष्ट्रध्वजाच्या अपमानाचा गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रीय ध्वज अपमान प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांन्वये प्रकरणी प्राथमिक तपास सुरु करण्यात आला आहे. नवभारत टाइम्सने या विषयीचे वृत्त दिले आहे. काही देशप्रेमींनी हा फोटो मुख्यमंत्री उत्तर प्रदेश, डीजीपी यांच्यासह अनेकांना टॅग केला आहे. तसेच कठोर कारवाईची मागणी केली आहे.
यापूर्वी स्वातंत्र्यदिनी तिरंगा उलटा फडकवणे, पाकिस्तानचे ध्वज फडकवणे यांसारखे प्रकार घडले आहेत. मदरशांतून देण्यात येणाऱ्या देशविरोधी घोषणा, प्रक्षोभक वक्तव्ये, हेही नवीन नाही. त्यात आता अशा प्रकारे तिरंग्याचा अपमान करण्याच्या घटनांची भर पडली आहे. केंद्र सरकार एकीकडे हार घर तिरंगा सारखे अभियान राबवून देशवासियांचे देशप्रेम वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा स्थितीत मदरशांतून जाणीवपूर्वक होणारा हा अपमान सरकारच्या भूमिकेला केलेला विरोधच दर्शवतो.
हेही पहा –