India’s Got Latent: युट्यूबर Ranveer Allahbadia याला महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावला समन्स

66

रणवीर इलाहाबादियाने (Ranveer Allahbadia) समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट (India’s Got Latent) शोमध्ये अश्लील टिप्पणी केल्यानंतर तो खूप अडचणीत सापडला आहे. त्याच्याविरुद्ध अनेक ठिकाणी एफआयआर (FIR) देखील दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात महाराष्ट्र सायबरने (Maharashtra Cyber ​​Cell) १७ फेब्रुवारी रोजी पुन्हा समन्स बजावले आहे. याद्वारे त्याला सोमवार २४ फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. असे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे. (Ranveer Allahbadia)

(हेही वाचा – River Purification: यमुना नदीच्या शुद्धीकरणास सुरुवात; नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी दिली माहिती)

‘इंडियाज गॉट लेटेंट’ शो वाद: युट्यूबर रणवीर अलाहाबादियाला महाराष्ट्र सायबरने २४ फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. विनोदी कलाकार समय रैना (Samay Raina) यांना मंगळवार (१८ फेब्रुवारी) सायबर सेलसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे, असे महाराष्ट्र सायबर सेलने म्हटले आहे.

(हेही वाचा – मुंबईत Highway Racing, प्रवाशांच्या जीवाशी खेळ; पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा)

युट्यूबर रणवीरसह सहकार्यांना देखील समन्स

रणवीर इलाहाबादियासह, अपूर्वा मुखिजा, आशिष चंचलानी, तुषार पुजारी आणि सौरभ बोथरा यांना देखील गुरूवार ६ मार्च रोजी समन्स बजावण्यात आले आहे. तर समय रैना, जसप्रीत सिंग आणि बलराज घई यांना मंगळवार ११ मार्च रोजी हजर राहण्याचे आदेश महाराष्ट्र सायबर सेलने दिल्याचे एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.