इंडिगो एअरलाइन्स विमानाच्या शौचालयात धूम्रपान करणाऱ्या खलील खान (३८) या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. तो उत्तर प्रदेशच्या फतेहपूरचा रहिवासी असून, त्याच्याविरोधात सहार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंडिगो एअरलाइन्सचे सीनिअर एक्झिक्युटिव्ह (सिक्युरिटी) राकेश भोईर (४२) यांच्या तक्रारीनुसार, २६ जूनला सायंकाळी ७.४५ च्या सुमारास १७६ प्रवासी असलेले विमान दिल्लीवरून मुंबईला येत होते. विमानात धूम्रपान करण्यास मनाई असताना खलील याने शौचालयात धूम्रपान केले. त्यानंतर तो त्याच्या २३ एफ क्रमांकाच्या आसनावर जाऊन बसला. विमानातील एका कर्मचाऱ्यास शौचालयातून सिगारेटच्या धुराचा दर्प येऊ लागल्याने त्याने तपासणी केली असता कचऱ्याच्या डब्यात त्यांना सिगारेटचे बट आणि जळलेली काडेपेटीची काडी दिसली. त्याचा एक फोटो घेऊन खलीलकडे चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याने शौचालयात धूम्रपान केल्याचे कबूल केले.
(हेही वाचा – Dengue Sting: राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात आरोग्याची स्थिती उघड, ‘या’ आजारांचे प्रमाण वाढले)
विमान उतरल्यावर ‘इंडिगो’च्या कर्मचाऱ्यांनी त्याच्याविरोधात तक्रार दिली. सहार पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून त्याला पोलिसांनी अटक केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community