घुसखोर बांगलादेशी महिलेने Ladki Bahin Yojana चा लाभ घेतल्याचा वकिलाचा दावा

39
घुसखोर बांगलादेशी महिलेने Ladki Bahin Yojana चा लाभ घेतल्याचा वकिलाचा दावा
  • प्रतिनिधी 

नागपाडा कामाठीपुरा येथून अटक करण्यात आलेल्या घुसखोर बांगलादेशी महिलांपैकी एका संशयित बांगलादेशी महिलेने लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ घेतला असून, तिच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते आल्याचा दावा अटक महिलेच्या वकिलांनी केला आहे. मात्र पोलिसांनी याला दुजोरा दिला नाही.

अटक करण्यात आलेल्या बांगलादेशींनी विधानसभा निवडणुकीत मतदान देखील केल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कामठीपुरा येथे टाकलेल्या छाप्यात ४ जणांना अटक केली असून त्यात दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. त्यातील एक पुरुष भारतीय असून तीन महिला आहेत. या महिला बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे. त्या बांगलादेशी एजंटमार्फत भारतात घुसखोरी करून आलेल्या होत्या. तसेच भारतीय असणाऱ्या यादवने मुंबईत त्यांची राहण्याची सोय केली होती.

(हेही वाचा – Tata Steel Chess 2025 : टाटा स्टील स्पर्धेत प्रग्यानंदाने मिळवली आघाडी, अर्जुन एरिगसीचा तिसरा पराभव)

महादेव जीवनलाल यादव, बिस्टी जलाल फकीर समफुल शेख, बिस्टी असुल अलिम अख्तर गुलाम रसूल अली, उर्मिला अख्तर मुल्ला खातून असे अटक करण्यात आलेल्या ४ जणांची नावे आहेत. मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाला मिळालेल्या माहितीवरून पोलिस पथकाने नागपाडा कामाठीपुरा येथील बंगला नंबर ३०८, ९ वी गल्ली, डिमटीमकर रोड या ठिकाणी छापा टाकून बांगलादेशी नागरिक असलेल्या तीन महिलांसह एका दलालाला अटक करण्यात आली होती. (Ladki Bahin Yojana)

(हेही वाचा – माजी खासदार Rahul Shewale यांच्या मागणीची दखल; केंद्राने राज्याला दिले ‘हे’ निर्देश)

पोलिसांनी अटक केलेल्या माहिलेकडे आधार कार्ड आणि काही कागदपत्रे सापडली. या महिलांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे आधार कार्ड बनवून मुंबईत राहत होत्या,  अशी माहिती समोर आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या तीन बांगलादेशी घुसखोर महिलांपैकी एका महिलेने लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ घेतला होता, लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते तिच्या बँक खात्यावर जमा झाले होते अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तिन्ही महिलांनी विधानसभा निवडणुकीत मतदान देखील केले होते अशी ही माहिती समोर आली. आरोपी उर्मिला खातूनचे वकील संदीप पांडे यांनी दावा केला आहे की त्यांचा आशिल बांगलादेशी नाही, कारण गेल्या विधानसभा निवडणुकी पूर्वी नोव्हेंबरपासून तिच्याकडे भारतीय आधार कार्ड आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत तिची नोंदणी झाली आहे असा पांडे यांनी दावा केला आहे. माझी आशिल उर्मिला खातून हिने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असून ती भारतीय असल्याचा दावा वकील पांडे यांनी केला आहे. मात्र पोलिसांनी याला दुजोरा दिला नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.