Jalna Maratha Andolan : जालना मराठा आंदोलनप्रकरणी गुप्तचर विभागाच्या अपयशाची चौकशी चालू

270
Jalna Maratha Andolan : जालना मराठा आंदोलनप्रकरणी गुप्तचर विभागाच्या अपयशाची चौकशी चालू
Jalna Maratha Andolan : जालना मराठा आंदोलनप्रकरणी गुप्तचर विभागाच्या अपयशाची चौकशी चालू
जालना येथील मराठा आंदोलन चिघळले आहे. त्या प्रकरणी आतापर्यंत जालनाचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी याना सक्तीच्या रजेवरही पाठवण्यात आले आहे. या स्थितीत गुप्तचर विभागाचे अपयश पुन्हा एकदा ठळक झाले आहे. गेली अनेक वर्ष सातत्याने अपयशी ठरणारा राज्याचा गुप्तचर विभाग जालना येथील लाठीमार दुर्घटनेत पुन्हा एकदा अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी लाठीमार करण्यापूर्वी ३ दिवस हे आंदोलन सुरू झाले होते. त्यामुळे हे आंदोलन कोणते वळण घेऊ शकेल, याचा अंदाज राज्याच्या गुप्तचर विभागाने राज्य सरकारला देण्याची गरज होती. या घटनेची चौकशी करण्यासाठी राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना जालनाला गेले आहेत. ते या गुप्तचर विभागाच्या अपयशाबद्दल चौकशी करणार आहेत.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दररोज सकाळी प्रत्येक क्षेत्रातील माहिती व तिचे विश्लेषण अहवाल सादर करण्याची जबाबदारी राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्तांची आहे. गेल्या वर्षी झालेल्या सत्तांतराची आगाऊ माहिती देखील सरकारला नव्हती. त्यामुळे गुप्तवार्ता  विभाग दिवसेंदिवस अपयशी ठरत असल्याची चर्चा गृह विभागात सुरू आहे.
या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी एसटी बसेस फोडण्यात येत असल्याने, तसेच बस जाळपोळीच्या घटना घडत असल्याने राज्य परिवहन महामंडळाकडून खबरदारी म्हणून मराठवाड्यात जाणाऱ्या शेकडो बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवासी आणि एसटीसह एसटीचे कर्मचारी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने यवतमाळ जिल्ह्यातून नांदेड, पुणे, संभाजीनगरसह मराठवाड्याकडे जाणाऱ्या 16 गाड्या स्थगित करण्यात आल्या आहेत. ऐनवेळी ही परिस्थिती उद्भवल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातून पुसद मार्गे जाणाऱ्या मराठवाड्यातील गाड्या सध्यास्थिती स्थगित करण्यात आल्या असून, मराठवाड्यातून सुद्धा बसेस यवतमाळ जिल्ह्यात येण्याचे थांबवल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे. परंतु आंदोलनाची परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुसद आगाराने दिली आहे. (Jalna Maratha Andolan)
औरंगाबाद, बीड, जालना, लातूरसह अहमदनगरकडे जाणाऱ्या अनेक बस सध्या डेपोतच उभ्या असल्याचे दिसून येत आहे. तर पुण्यातून जाणाऱ्या 600 पेक्षा अधिक बस रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. (Jalna Maratha Andolan)
हेही पहा – 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.