Internet Connection : शिवडीत इंटरनेट वॉर, परस्परांविरोधात गुन्हे दाखल दोन जखमी, चौघांना अटक

इंटरनेट पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी शहरामध्ये नेमलेल्या वितरकामध्ये इंटरनेट कनेक्शन देण्यावरून वाद सुरु झाले आहे.

531
Internet Connection : शिवडीत इंटरनेट वॉर, परस्परांविरोधात गुन्हे दाखल दोन जखमी, चौघांना अटक
Internet Connection : शिवडीत इंटरनेट वॉर, परस्परांविरोधात गुन्हे दाखल दोन जखमी, चौघांना अटक

लॉकडाऊनच्या काळात मुंबईसह इतर महानगरामध्ये इंटरनेट कनेक्शनची (Internet Connection) मोठ्या प्रमाणात मागणी वाढली होती, इंटरनेटच्या वाढत्या मागणीमुळे केबल व्यवसायिकांचा कल इंटरनेट कनेक्शन (Internet Connection) पुरवठ्याकडे वळताना दिसून येत होता. त्यात स्मार्ट आणि अँड्रॉइड टेलिव्हिजनमुळे ही मागणी आणखी जोर धरू लागल्यामुळे इंटरनेट पुरवठा कंपन्यांमध्ये रस्सीखेच सुरु झाली. इंटरनेट पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी शहरामध्ये नेमलेल्या वितरकामध्ये इंटरनेट कनेक्शन (Internet Connection) देण्यावरून वाद सुरु झाले आहे. असाच एक प्रकार मुंबईतील शिवडी परिसरात घडला असून विभागात इंटरनेट पुरवठा करण्यावरून झालेल्या वादात पाच जणांनी दोन जणांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना केईएम आणि ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी शिवडी पोलिसांनी परस्परांविरुद्ध गुन्हा दखल केला असून एका गुन्ह्यात ६ आरोपी असून दुसऱ्या गुन्ह्यात २ जण आरोपी असल्याची माहिती शिवडी पोलिसांनी दिली आहे. (Internet Connection)

नितांत गुरुनाथ कोळी (२६) आणि नरीमन जमषेद झोयाबी असे या हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांची नावे असून विकास कोळी, वीणा कोळी, रुपेश कोळी, गेवीन कोळी आणि स्टीव्हन गोसाविल्स असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत. शिवडी कोळीवाडा परिसरात नितांत कोळी यांचा ‘चॅनल प्लस केबल नेटवर्क’ नावाने इंटरनेटचा व्यवसाय शिवडी परिसरात इंटरनेट सेवा पुरवण्याचे काम करतात. त्याच परिसरात गेविन कोळी हा देखील इंटरनेट केबलचा व्यवसाय करीत आहे. दोघांकडे वेगवेगळ्या कंपन्यांचे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाडर आहे. दोन दिवसापूर्वी नितांत कोळी याच्या ग्राहकांचे इंटरनेट सेवा बंद झाल्यामुळे त्यांची कनेक्शन तपासले असता शिवडी रेल्वे स्थानक येथून आलेली मुख्य इंटरनेट केबल कट झाल्याचे समोर आले. ही केबल गेल्व्हिन कोळी यांच्या माणसांनी कट केली असल्याचा संशयावरून नितांत आणि गेल्व्हिन यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. ६ डिसेंबर रोजी दुपारी इंटरनेट कनेक्शन (Internet Connection) बंद झाल्याची माहिती नितांत याने नरिमन याला दिली, नरिमन याने त्या शिवडी बापदेव मंदिराजवळ येण्यास सांगितले. नितांत त्या ठिकाणी गेला आणि नरिमन आणि नितांत यांच्यात चर्चा सुरु असताना वीणा कोळी तसेच गॅवीन कोळी, स्टीव्हन गोंसाल्वीस व विकास कोळी हे आले. (Internet Connection)

(हेही वाचा – Brian Lara on Virat Kohli : सचिनच्या १०० शतकांचा विक्रम विराटला जड जाईल असं ब्रायन लाराला का वाटतं?)

या पाच जणांनी नरिमन आणि नितांत यांना शिवीगाळ देण्यास सुरुवात केली यातुन वाद निर्माण होऊन दोन्ही गटात हाणामारी होऊन नितांत आणि नरिमन यांना पाच जणांनी लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. तर विकास कोळी याने नितांत याला रिव्हॉल्वर दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली असे तक्रारीत म्हटले आहे. या हल्ल्यात नितांत आणि नरिमन हे दोघे जखमी झाले असून दोघे ग्लोबल आणि केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शिवडी पोलिसांनी परस्परविरुद्ध गुन्हे दाखल केले असून ग्लेव्हीन कोळीसह पाच जणांविरुद्ध हत्येचा प्रयत्न, दंगल घडविणे आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून ४ जणांना अटक करण्यात आली आहे, तसेच नितांत नरिमन यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३२६ (गंभीर दुखापत करणे) प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक चंदनशिवे यांनी दिली. दोन्ही गट परिसरात केबल इंटरनेट सेवा पुरवण्याचे काम पुरवतात, शिवडी रेल्वे स्थानकाजवळ इंटरनेट केबल कट झाल्याच्या संशयावरून हा वाद झाला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. (Internet Connection)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.