महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या ललित पाटील (Lalit patil) एमडी ड्रग्ज प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांचे पथक शिंदे गावात दाखल झाले. ड्रगमाफिया ललित पाटील (drugmafia Lalit Patil) केस प्रकरणात एमडी ड्रग्ज अड्ड्याची माहिती घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक रविवारी, २२ ऑक्टोबरला सकाळी साडेआठच्यादरम्यान शिंदे गावात गेले. त्यांनी गावातील ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण पाटील चालवत असलेल्या एमडी ड्रग्ज अड्ड्याची तपासणी केली.
रविवारी, (१५ ऑक्टोबर) पुणे पोलिसांचे पथक शिंदे गावात भूषण पाटील (ललित पाटीलचा भाऊ) याला घेऊन गेले होते. त्यांनीही एमडी ड्रग्ज अड्ड्याची पाहणी करत काही कामगारांची चौकशी केली होती. पोलिसांचे पथक गुप्त पद्धतीने या प्रकरणाचा शोध घेत आहे. पोलीस गावात गुप्त पद्धतीने आले आणि निघून गेले. दोन वाहनांसह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश या पथकात होता. डोंगरावर अतिशय निर्जन ठिकाणी असलेला ह अड्डा साकीनाका पोलिसांनी शोधला होता.
(हेही वाचा – National Association for the Blind : दिव्यांगांनी एकापेक्षा अधिक कौशल्ये आत्मसात करावी – राज्यपाल रमेश बैस)
शिंदे गावात छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत. कंपन्यांवर नाव उत्पादनाचा फलक लावलेला होता, पण शिंदे औद्योगिक वसाहतीतील बहुतेक कंपन्यांच्या बाहेर फलकच दिसत नाही. शिंदे गावात रविवारी ड्रग्ज अड्ड्याच्या तपासणीसाठी मुंबई पोलिसांचे पथक आले होते. या प्रकरणातील चौधरी नावाच्या संशयित आरोपीला घेऊन पोलीस येणार असल्याची आमच्याकडे नोंद आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community