बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी गुन्हे शाखेकडे सोपविण्याचे आदेश दिले. बोपदेव घाट (Bopdev Ghat) परिसरात ३ ऑक्टोबर रोजी रात्री मित्राबरोबर फिरायला आलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली होती.
(हेही वाचा – हे अपघात जाणीवपूर्वक होत आहेत; Mysore-Darbhanga Express Accident नंतर केंद्रीय मंत्र्यांचे मोठे विधान)
याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोंढवा पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. कोंढवा पोलिसंसह गुन्हे शाखेची पथके समांतर तपास करत आहेत. बलात्कार प्रकरणात एका २५ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली. त्याचे दोन साथीदार पसार आहेत. या प्रकरणाचा तपास ६० पथकांकडून करण्यात येत आहे. गु्न्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपविण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. या प्रकरणात अटकेत असलेला २५ वर्षीय तरुण मूळचा मध्य प्रदेशातील आहे. त्याच्याबरोबर असलेले दोन साथीदार पसार झाले असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. लूटमारीचे गुन्हे करण्यासाठी ते मध्य प्रदेशातून पुण्यात आले होते.
बोपदेव घाटात (Bopdev Ghat) गुन्हा करण्यापूर्वी रात्री दहाच्या सुमारास त्यांनी त्यांचे मोबाइल संच बंद केले. घाटात एके ठिकाणी त्यांनी मद्यप्राशन केले. त्यानंतर ते लूटमार करण्याच्या तयारीत होते. त्यावेळी त्यांनी एकातांत बसलेल्या तरुण-तरुणीला पाहिले. आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून त्यांनी दोघांना मारहाण केली. कोयत्याच्या धाकाने तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता. तरुणीवर अत्याचार केल्यानंतर आरोपी बोपदेव घाटातून उतरले. अर्धा तास ते एके ठिकाणी थांबले होते. त्यानंतर ते दुचाकीवरून पुढे गेले. त्यांनी मुख्य रस्ता टाळून पायवाटेचा वापर केला. सातारा रस्त्यावरील शिंदेवाडी परिसरात ते गेले. तेथून ते आडमार्गाने गेले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community