मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून ५०० कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी शनिवार (५ ऑगस्ट) चौकशी करण्यात आली. आमदार रवींद्र वायकर यांचा ५०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीच्या प्राथमिक चौकशीचा भाग म्हणून ही चौकशी करण्यात येत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सोमय्या यांच्या आरोपानुसार, वायकर यांनी फसवणूक करून उद्यानासाठी राखीव असलेल्या भूखंडावर पंचतारांकित हॉटेलच्या बांधकामाची मंजुरी मिळवून मुंबई महानगर पालिकेचे मोठे नुकसान केले. आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वीच मनपाच्या उद्यान आणि वृक्ष विभाग आणि इमारत प्रस्ताव विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे.
(हेही वाचा – काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने महापालिका अभियंत्याच्या डोळ्यात शाई फेकली)
वायकर यांनी यापूर्वी सोमय्या यांचे आरोप खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले होते आणि त्यांच्याकडे या भूखंडाची सर्व कागदपत्रे असून कोणत्याही नियमाचे किंवा कायद्याचे उल्लंघन झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.
आर्थिक गुन्हे शाखेला प्राप्त झालेल्या प्रत्येक तक्रारीवर प्राथमिक चौकशी केली जाते. त्या प्राथमिक चौकशीत तथ्य आढळून आल्यास तसेच ठोस पुरावे हाती लागल्यास गुन्हा दाखल केला जातो. तसेच प्राथमिक चौकशीत पुरेशी कागदपत्रे आणि पुरावे न मिळाल्यास, प्राथमिक चौकशी बंद केली जाते.
या वर्षी मार्चमध्ये या संदर्भात सोमय्या यांनी कथित घोटाळ्याबद्दल आझाद मैदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती आणि ती पुढील चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आली होती.
सोमय्या यांनी तक्रारीत आरोप केला आहे की, २६ जुलै २०२१ रोजी, बीएमसीने व्यारवली गावात, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड मधील प्लॉट क्रमांक १-बी आणि १ -सी वर पंचतारांकित हॉटेल मंजूर केले होते, जे वायकर यांच्या मालकीचे आहे. सोमय्या यांनी दावा केला की हा भूखंड उद्यान किंवा उद्यानासाठी आरक्षित होता आणि वायकर आणि त्यांचे इतर भागीदार बांधकामासाठी वापरत होते.
सोमय्या यांनी आरोप केला होता की मनपाच्या इमारत प्रस्ताव विभागाने बेकायदेशीरपणे हॉटेलला मंजुरी दिली. या करारातून ५०० कोटी रुपयांचा बेकायदेशीर फायदा झाला होता आणि त्याच्या बांधकामानंतर ५०० कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल अपेक्षित होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community