Ghatkopar Hoarding दुर्घटना प्रकरणात आयपीएस अधिकारी यांची पत्नी संशयाच्या भोवऱ्यात

242
Ghatkopar Hoarding दुर्घटना प्रकरणात आयपीएस अधिकारी यांची पत्नी संशयाच्या भोवऱ्यात
Ghatkopar Hoarding दुर्घटना प्रकरणात आयपीएस अधिकारी यांची पत्नी संशयाच्या भोवऱ्यात

घाटकोपर होर्डिंग (Ghatkopar Hoarding) दुर्घटना प्रकरणात एका आयपीएस अधिकारीच्या पत्नीचे नाव समोर येत आहे. इगो मीडिया कंपनीने २०२१ ते २०२२ दरम्यान १० वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ३९ व्यवहारांद्वारे ४६.५ लाख रुपये पाठवले आणि सर्व पैसे कथितरित्या ओळखल्या जाणाऱ्या अर्षद खान (Arshad Khan) या व्यक्तीने घेतल्याचे तपासात समोर आले आहे. अर्षद खान (Arshad Khan) हा आयपीएस अधिकारी यांच्या पत्नी संचालक असलेल्या एका कंपनीत सह संचालक असल्याचा दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे. होर्डिंग प्रकरणात तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाकडून अर्षद खान याला लवकरच चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे. (Ghatkopar Hoarding)

(हेही वाचा- T20 World Cup, Ind vs Ban : बांगलादेशचा ५० धावांनी पराभव करत भारताचं बाद फेरीच्या दिशेनं मजबूत पाऊल )

घाटकोपर पूर्व येथे महाकाय बेकायदेशीर होर्डिंग (Ghatkopar Hoarding) कोसळून त्यात १७ जणांचा मृत्यू झाला होता, तसेच जवळपास ८० जण जखमी झाले होते. हे बेकायदेशीर होर्डिंग रेल्वे पोलिसांच्या जागेत इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून उभारण्यात आले होते. या बेकायदेशीर होर्डिंगला तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त यांनी मंजुरी दिली होती. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत असून या तपासासाठी गुन्हे शाखेने विशेष तपास पथक गठीत केले आहे. होर्डिंग दुर्घटना प्रकरणात विशेष तपास पथकाने इगो कंपनीचा मालक भावेश भिंडे (Bhavesh Bhinde), तत्कालीन संचालक जान्हवी मराठेसह चार जणांना अटक करण्यात आली होती, सध्या या चौघांची रवानगी न्यायालयीन कोठडी करण्यात आली आहे. (Ghatkopar Hoarding)

विशेष तपास पथकाच्या तपासात इगो मीडिया कंपनीने एका आईपीएस अधिकारी यांची पत्नी ज्या कंपनीत संचालक आहे, त्या कंपनीच्या सहसंचालक असलेल्या व्यक्तीच्या १० वेगवेगळ्या बँक खात्यावर ३९ व्यवहारांमध्ये ४६.५ लाख रुपयांचा व्यवहार केल्याचे समोर आले आहे. अर्षद खान असे या सहसंचालकाचे नाव आहे, अशी माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राने एका वरिष्ठ अधिकारी यांच्या हवाल्याने दिली आहे. हा व्यवहार २०२१ आणि २०२२ वर्षात करण्यात आला आहे, अर्षद खान याने इगो मीडियाकडून विनानावाचे धनादेश घेऊन शिवाजीनगर गोवंडी परिसरातील काही गरीब व्यक्तीच्या बँक खात्यावर हे धनादेश वटविले असल्याची माहिती विशेष तपास पथकाच्या तपासात समोर आली असल्याचे वृत्तपत्राने म्हटले आहे. (Ghatkopar Hoarding)

(हेही वाचा- Pune Accident : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराच्या पुतण्याने दुचाकीस्वाराला चिरडले; दुचाकीस्वार जागीच ठार)

विशेष तपास पथकाने संबंधित खातेदारांशी संपर्क साधला असता ते आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे आढळले. त्यांनी विशेष तपास पथकाच्या चौकशीत सांगितले की, शिवाजी नगरमध्ये रहाणारा अर्शद खान त्यांच्या ओळखीचा होता आणि त्यांनी पैसे हस्तांतरित करण्यासाठी त्यांच्या बँक खात्याचा तपशील मागितला होता, असे खातेदारांनी सांगितले असे पोलीस सूत्रांनी सांगितले. विशेष तपास पथक लवकरच अर्षद खान (Arshad Khan) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे याबाबत चौकशी करून त्याचा जबाब नोंदविण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. अर्षदच्या चौकशीत आयपीएस अधिकारी यांच्या पत्नीचा काय संबंध आहे का? हे समोर येईल, असे अधिकारी यांनी म्हटले आहे. (Ghatkopar Hoarding)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.