अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजे ईडी बुधवारी (२८ जून) भारतीय महसूल सेवा (आयआरएस) अधिकारी आणि सीमाशुल्क आणि जीएसटीचे अतिरिक्त आयुक्त सचिन सावंत यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली. ईडीच्या सूत्रांनी अटकेला दुजोरा दिला असून सावंत यांच्या मुंबईतील निवासस्थानासह त्याच्याशी संबंधित विविध ठिकाणी मंगळवारी (२७ जून) छापेमारी करण्यात आल्याची माहिती दिली.
सचिन सावंत हे यापूर्वी ईडीच्या मुंबईतील झोन कार्यालयात उपसंचालक म्हणून कार्यरत होते. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात त्यांचे नाव आले आहे. जीएसटी विभागाच्या एका प्रकरणाच्या तपासात सावंत यांचा कथित सहभाग होता. हिरे व्यापारी यांच्याकडून ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम बेकायदेशीरपणे वळवणे आणि हस्तांतरित केल्याच्या आरोपावरून सचिन सावंत यांना चौकशीला सामोरे जावे लागत आहे.
(हेही वाचा – Stock Market : सेन्सेक्स, निफ्टीने गाठला नवा उच्चांक; सेन्सेक्स ६३७१६ तर, निफ्टीची विक्रमी घौडदोड)
सचिन सावंत यांनी त्यांच्या कार्यकाळात बेकायदेशीर कारवाया उघडकीस आणल्या होत्या. दरम्यान सावंत यांच्या विरोधात एका आरोपीने तक्रार दाखल केली होती. त्या आरोपावरून परिणामी केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) ने सावंत यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
सावंत यांच्या निवासस्थानावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी टाकलेला छापा हा आयआरएस अधिकाऱ्यावरील आरोपांचा चौकशीचा एक भाग म्हणून पाहिला जात आहे. ईडी या प्रकरणातील मनी लॉन्ड्रिंग पैलूचा शोध घेत असून या गुन्ह्यातून मिळालेली रक्कम कोणती मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरली गेली आहे का, याचीही ईडीकडून चौकशी सुरू आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community