IT Raid: नाशिकमध्ये आयकर विभागाची धाड! बंगल्यातील फर्निचर फोडून काढल्या नोटा

249
IT Raid: नाशिकमध्ये आयकर विभागाची धाड! बंगल्यातील फर्निचर फोडून काढल्या नोटा
IT Raid: नाशिकमध्ये आयकर विभागाची धाड! बंगल्यातील फर्निचर फोडून काढल्या नोटा

नाशिक शहरातील सराफ व्यवसायिकांकडे गेल्या दोन दिवसांपासून आयकर विभागाची छापेमारी (IT Raid) सुरू आहे. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या एका ज्वेलर्सच्या दुकानावर तसेच त्यांच्या निवासस्थानावर आणि इतर ठिकाणी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून 30 तासांपासून तपासणी सुरू आहे. एकाच ज्वेलर्सच्या दोन दालनांमध्ये तपासणी सुरु होती. नाशिक, (Nashik) नागपूर, जळगावच्या पथकातील 50 अधिकाऱ्यांची एकाच वेळी कारवाई केली. या छापेमारीत बंगल्यातील फर्निचर फोडून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी नोटा काढल्या. (IT Raid)

सलग ३० तास ही तपासणी

आयकर विभागाच्या छाप्यात (IT Raid) 26 कोटींची रोकड तर 90 कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेची दस्तऐवज जप्त करण्यात आले. सलग ३० तास ही तपासणी करण्यात आली. आयकर चुकवल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली. नाशिकप्रमाणे मनमाड शहरात आयकर विभागाने छापेमारी केली. मालेगावमधील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका उद्योगपतीच्या घरावर आणि कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. ज्या उद्योगपतीच्या घर आणि उद्योगावर छापा टाकला त्याचे वेगवेगळे व्यवसाय आहेत. याबाबत आयकर विभागाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली. (IT Raid)

पोलिसांचा बंदोबस्त तैनात

अचानक झालेल्या छापेमारीत (IT Raid) कर बुडव्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले. मागील काही दिवसांपासून कर बुडवे व्यवसायिक हे आयकर विभागाच्या रडारवर होते. त्यानुसार आयकर विभागाचे अधिकारी खासगी वाहनातून नाशिकमध्ये दाखल झाले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी छापेमारी सुरू केली. ज्या ठिकाणी छापेमारी सुरू होती, त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. (IT Raid)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.