जालन्यामधून एक भीषण अपघाताची (Jalna Accident) बातमी समोर आली आहे. जालना ते वडीगोद्री मार्गावर बस आणि मोसंबी वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून 14 जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याचीही भिती व्यक्त करण्यात येत आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दोन्ही गाड्यांचा पुरता चक्काचूर
प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, गेवराईकडून अंबडकडे जाणाऱ्या बसची आणि मोसंबी भरून येणाऱ्या आयशर ट्रकचा समोरा समोर अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही गाड्यांचा पुरता चक्काचूर झाला आहे. या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. त्यापैकी काही जण गंभीर आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो. (Jalna Accident)
नेमकं काय घडलं?
दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून टेम्पोतील मोसंबी रस्त्यावर विखरून पडली होती. मार्गावरील वाहतूकही प्रभावित झाली होती. महामंडळाची बस बीड जिल्ह्यातील गेवराई येथून जालन्याकडे जात होती तर टेम्पो हा जालन्याहून बीडकडे मोसंबी घेऊन जात होता. दुसऱ्या वाहनाला मागे सारून पुढे जाण्याच्या घाईत समोरून येणाऱ्या बसवर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला, बस मध्ये एकूण २४ प्रवाशी होते यातील किरकोळ जखमींना अंबड येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी हलवण्यात आलय. इतर जखमी व मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. (Jalna Accident)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community