देवदर्शनासाठी निघालेल्या पती-पत्नीच्या गाडीला शुक्रवारी २३ जून रोजी जालन्यामध्ये अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या कारला अचानक लागलेल्या आगीत महिलेचा (सविता सोळुंके) होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणासंबंधी आता एक नवीन माहिती समोर आली आहे. त्यानुसार हा सर्व प्रकार केवळ अपघात नसून घातपात असल्याचा पोलिसांचा दाट संशय आहे. अशातच मृत महिलेच्या पतीला मंठा येथून पोलिसांनी अटक केली आहे.
काही दिवसांपुर्वी (२३ जून) जालन्यात विचित्र अपघाताची चर्चा रंगली होती. देवदर्शनाला गेलेल्या जोडप्याच्या गाडीला मागून एका टेम्पोने धडक दिली. त्यानंतर मृत महिलेच्या पती आणि त्या टेम्पो चालकामध्ये वाद झाला. चालकासोबत वाद घालण्यासाठी पती गाडीतून खाली उतरला आणि तेवढ्यात अचानक गाडीने पेट घेतला आणि पत्नीचा यामध्ये होरपळून मृत्यू झाला. या सर्व घटनेचा कट पतीनेच रचल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
(हेही वाचा – कोयता हल्ल्यातून तरुणीला वाचवणाऱ्या तरुणाचे देवेंद्र फडणवीसांनी केले कौतुक)
नेमका प्रकार काय?
जालना जिल्ह्यातील तळणी फाटा येथे पहाटे ४ च्या सुमारास पती-पत्नी दर्शनासाठी शेगावहून गावाकडे परत येत होते. तेवढ्यात रस्त्यातच स्विफ्ट कारला मागून एका पीकअपने धडक दिली. पिकअपच्या चालकाशी भांडायला पती रागातच गाडीतून उतरला आणि काही क्षणांत त्याच्या गाडीने पेट घेतला. अपघातानंतर कारने पेट घेतल्याने एका ३३ वर्षीय महिलेचा जळून अक्षरशः कोळसा झाला असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस तपासात अपघात झाला नसून पतीनेच पत्नीच्या हत्येचा कट रचल्याचा संशय पोलिसांना आला आहे. त्यामुळे पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community