Maratha Reservation: मराठा आरक्षण उपोषणावेळी दगडफेक करणाऱ्या प्रमुख आरोपीला अटक

आरोपीकडून पोलिसांनू पिस्तुलासह २ जिवंत काडतुसं जप्त केली आहेत.

154
Maratha Reservation: मराठा आरक्षण उपोषणावेळी दगडफेक करणाऱ्या प्रमुख आरोपीला अटक
Maratha Reservation: मराठा आरक्षण उपोषणावेळी दगडफेक करणाऱ्या प्रमुख आरोपीला अटक

अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरू असलेल्या उपोषण स्थळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षानंतर लाठीचार्ज आणि दगडफेकीची घटना घडली होती. या दगडफेकीच्या घटनेतील आरोपी ऋषिकेश बेदरेला जालन्यातील अंबड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपी बेदरेकडून एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसं जप्त केली आहेत.

जालन्यातील अंतरवली सराटीमध्ये मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या उपोषणास्थळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर झालेल्या दगडफेकीच्या संदर्भात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडे पोलिसांकडून गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुस आढळून आली आहेत.

(हेही वाचा – Drug Crime Branch : ड्रग्जच्या व्यसनासाठी पोटच्या मुलांचा सौदा)

ऋषिकेश बेदरेवर गोंदी पोलीस ठाण्यात कट रचून जीवे मारण्याच्या उद्देशाने दगडफेक केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याचा शोध घेत असताना तो इतर 2 साथीदारांसह आढळून आला होता. पोलिसांनी त्यांच्यावर 307 कलमातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

या लाठीचार्ज प्रकरणी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात येत होती. त्यानंतर या लाठीचार्ज प्रकरणी फडणवीसांनी आदेश दिले नसल्याची माहिती समोर आली होती. तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्याचबरोबर हे पिस्तुल त्यांच्याकडे कसं आलं याचा तपास पोलीस शोध घेत आहेत.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.