जालन्यातील छत्रपती संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar) रोडवरील चंदनझिरा (Chandanzira Toll Plaza firing) परिसरात असलेल्या टोलनाका येथे कारमधून आलेल्या अज्ञात आरोपीकडून ट्रक चालकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. गोळीबाराची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून, जुन्या वादातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या गोळीबारामध्ये मुंबई येथील राहणारा मोहम्मद रिजवान असामुद्दिन याच्या कंबरेला गोळी लागली गेल्याने तो जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी जालना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनास्थळी जालन्याचे अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपणी (ADSP Ayush Nopani) यांनी भेट दिली असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहे. (Jalna Truck Firing)
नेमके काय घडले?
मोहम्मद रिझवान हसाबुद्दीन (Mohammad Rizwan Hassabuddin) असं गोळीबारात जखमी झालेल्या ट्रक चालकाचं नाव आहे. मोहम्मद रिझवान हसबुद्दीन हा ट्रकमध्ये भंगार माल घेऊन मुंबईहून जालन्याकडे निघाला होता. त्याचवेळी जालना शहरातील जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील टोला नाक्याजवळ कारमधून आलेल्या तिघांनी ट्रकचालक मोहम्मद रिझवान हसबुद्दीनवर हल्ला केला. जखमी ट्रकचालकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण जीवे मारण्याच्या उद्देशानेच त्याच्यावर फायरिंग करण्यात आले, हा हल्ला झाला असं पीडित इसमाचं म्हणणं आहे.
(हेही वाचा –Ronaldo Net Worth : ख्रिस्तियानो रोनाल्डोची एकूण मालमत्ता, त्यातं घर, आलिशान गाड्या यांच्याविषयीच्या रंजक गोष्टी )
3 गोळ्या झाडल्या
गाडी रस्ताच्या कडेला उभी करत ट्रक चालक चहा पिण्यासाठी बाहेर पडला होता. तेव्हाच संधी साधून आरोपी व त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर 3 गोळ्या झाडल्या. पूर्व वैमनस्यातूनच हा हल्ला करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
हेही पाहा –