समर्थांच्या देवघरातील मूर्ती चोरी प्रकरणात दोघांना अटक; एका आरोपीचा तपास सुरु

220

जालना जिल्ह्यातील जांब समर्थ येथील समर्थांच्या देवघरातील मूर्तीचोरी प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तर या प्रकरणातील मुख्य आरोपीचा तपास सुरु आहे. पोलिसांनी अटक केलेल्या दोन आरोपींकडून समर्थांच्या हनुमानाच्या मूर्ती जप्त केल्या आहेत. जालनामधील समर्थ रामदासांच्या जन्मगावी जांब समर्थ येथील राम मंदिरातून ऐतिहासिक मूर्ती ऑगस्ट महिन्यात चोरीला गेल्या होत्या. मंदिरातून 450 वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी आता पोलिसांना मोठे यश आले आहे.

( हेही वाचा: कुर्ला परिसरातील कपड्याच्या गोदामांना मोठी आग )

एक आरोपी अजूनही फरार 

समर्थ रामदासांच्या जन्मगावातील राममंदिरातून ऐतिहासिक मूर्ती ऑगस्ट महिन्यात चोरीला गेल्या होत्या. पोलिसांनी आता कर्नाटक आणि सोलापूरमधून दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार आहे. धक्कादायक म्हणजे या चोरांनी या ऐतिहासिक मुर्ती 25 हजार रुपयांना विकल्या होत्या. या घटनेचा तपास स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम अर्थात SIT च्या मार्फत सुरु आहे. पोलीस महासंचालकांच्या सुचनेवरुन या एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. या चोरीच्या घटनेच्या सखोल तपासासाठी तामिळनाडू पोलिसांच्या एक्सपर्ट आयडाॅल विंगची मदत घेतली जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.