गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) दहशतवादी कारवाया वाढताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी राज्यात बंदोबस्त वाढवला आहे. अशातच, आज (१९ जून) काश्मीर खोऱ्यातील बारामुल्ला (Baramulla) येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला असून, एक एसओजी (जम्मू-काश्मीर पोलीस) जवान जखमी झाला आहे. (Jammu and Kashmir)
(हेही वाचा –India’s Export to Great Britain : भारताची ग्रेट ब्रिटनला निर्यात वाढली, भारत चीनच्याही पुढे)
#WATCH | Baramulla, J&K: Encounter underway between security forces and terrorists at Hadipora area of PD Sopore.
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/sgnVMjegA2
— ANI (@ANI) June 19, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून ही कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई सुरू असल्याची माहिती काश्मीर झोन पोलिसांनी दिली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जिल्ह्यातील सोपोरमधील हदीपोरा भागात दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर लष्कर, सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने शोधमोहीम सुरू केली. यावेळी अचानक दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. (Jammu and Kashmir)
(हेही वाचा –Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्ताने श्री जीवदानी देवी मंदिराच्या डोंगर पायथ्याशी वृक्षारोपण)
सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर देण्यासाठी गोळीबार केला, या घटनेत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. मात्र, अद्याप दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही. दरम्यान, या चकमकीत एसओजीच्या एका जवानाला गोळी लागली असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या परिसरात शोधमोहिम सुरू आहे. याशिवाय, रियासी हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितालाही ताब्यात घेतले आहे. (Jammu and Kashmir)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community