मागील अनेक महिन्यांपासून जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir Encounter) काही भागात सुरक्षा रक्षक आणि दहशदवादी यांच्यात वारंवार चकमकी होत आहे. अशी घटना पुन्हा घडली असून, ही घटना जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा (Kupwara encounter) येथे पुन्हा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक (Jammu Kashmir terror attack) झाल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित घटना ही कुपवाडा अंतर्गत येणाऱ्या नियंत्रण रेषेजवळ केरन सेक्टरमध्ये (Kupwara Keran Sector) ही घटना घडली आहे. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. भारतीय लष्कराने ट्विट करुन याबाबत माहिती दिली. (Jammu Kashmir Encounter)
OP RAJBIR, KERAN #Kupwara
An Infiltration attempt has been successfully prevented with the elimination of two terrorists today on #LoC in Keran Sector, #Kupwara.
Anti Infiltration Operations are continuing #Kashmir@adgpi@NorthernComd_IA pic.twitter.com/77xdqYMza1
— Chinar Corps🍁 – Indian Army (@ChinarcorpsIA) July 18, 2024
ट्वीटमध्ये सांगितले की, ठार झालेले दहशतवादी पाकिस्तानातून भारतात घुसण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. सध्या परिसरात शोध मोहिम राबवली जात आहे.
(हेही वाचा – राज्याच्या पर्यटन धोरणातून १८ लाख रोजगार निर्मिती होणार; पर्यटनमंत्री Girish Mahajan यांचा दावा)
दोडा येथे दोन जवान जखमी
यापूर्वी जम्मूच्या डोडा अंतर्गत येणाऱ्या कास्तीगडमध्येही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जवान जखमी झाले. या घटनेनंतर जवानांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली आहे. जखमी जवानांना उधमपूरच्या कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community