अंमलबजावणी संचालनालयाने ED जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल, त्यांचे कुटुंब आणि इतरांविरुद्ध चौकशी केलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जेट एअरवेज इंडिया लिमिटेड (जेआयएल) ची ५३८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये विविध कंपन्या आणि व्यक्तींच्या नावे १७ निवासी फ्लॅट-बंगले आणि व्यावसायिक जागेचा समावेश आहे. जप्त केलेल्या काही मालमत्ता जेआयएलचे संस्थापक नरेश गोयल, त्यांची पत्नी अनिता गोयल आणि मुलगा निवान गोयल यांच्या नावे लंडन, दुबई आणि भारतातील विविध राज्यांमध्ये आहेत.
जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना ED ने कॅनरा बँकेच्या ५३८ कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी अटक केली होती. ईडीने २ महिन्यांपूर्वी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नरेश गोयल यांना अटक केली होती. त्यांच्यावर ५३८ कोटींच्या आर्थिक फसवणुकीचा आरोप आहे. मंगळवारी ED ने या प्रकरणी गोयल त्यांची पत्नी आणि अन्य लोकांवर आरोपपत्र दाखल केले होते. तपासावेळी ईडीला जेआयएलने कॅनरा बँक आणि पीएनबीसह एसबीआय बँकेकडून कर्ज घेतल्याचे उघड झाले. नरेश गोयल आणि इतरांविरुद्ध ED ने फसवणुकीचा नवीन गुन्हा दाखल केला आहे. नुकतेच गोयल यांच्या मुंबई आणि दिल्लीतील आठ ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. ५३८ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी छापा टाकल्यानंतर त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली. सीबीआयने आपल्या तपासात गोयल, त्यांची पत्नी अनिता गोयल आणि जेट एअरवेजचे माजी संचालक गौरांग आनंद शेट्टी यांना आरोपी केले. कॅनरा बँकेच्या तक्रारीवरून तपास यंत्रणेने नवीन गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या तक्रारीत, कॅनरा बँकेने आरोप केला होता की त्यांनी जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेडला (जेआयएल) ८४८.८६ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते, त्यापैकी ५३८.६२ कोटी रुपये थकित आहेत.
(हेही वाचा Maratha Reservation : हिंसक आंदोलकांवर उगारला कायद्याचा बडगा; पोलीस महासंचालकांनी दिली माहिती)
Join Our WhatsApp Community