एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद, छोटा शकील आणि छोटा राजन टोळीच्या नावाने व्यावसायिकांना धमकावणारे गुंड आता व्यावसायिकाकडून खंडणी गोळा करण्यासाठी लॉरेन्स बिष्णोई आणि गोल्डीबार टोळीच्या नावाचा वापर करीत असल्याचा प्रकार ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे समोर आला आहे.
अंबरनाथ पूर्वेत राहणाऱ्या एका ज्वेलर्स मालकाला अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला होता. फोन करणाऱ्या अनोळखी व्यक्तीने तो लॉरेन्स बिष्णोई टोळीचा सदस्य असल्याचे सांगून २० हजार रुपयांची खंडणी मागितली. खंडणी नाही दिली तर मुलीचे अपहरण करण्यात येईल, त्यानंतर मुलीच्या सुटकेसाठी २० लाख द्यावे लागतील. या धमकीने घाबरलेल्या परबतसिंग, किशोरसिंग चुडवाल ज्वेलर्स मालकाने अंबरनाथ पूर्वेतील शिवाजी नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. धमकी देणारी व्यक्ती ही स्थानिक गुंड असावी, त्याने सद्या कुप्रसिद्धीतीच्या झोतात असलेला गुन्हेगार लॉरेन्स बिस्नोईच्या नावाचा वापर करून धमकी दिली असावी अशी माहिती पोलिसांनी दिली. लॉरेन्स बिष्णोई हा गुंड पंजाबच्या तुरुंगात असून त्याने काही महिन्यांपूर्वी पंजाबमधील गायक सिद्धू मुसावाला यांची हत्या केली होती. तसेच बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला काळवीट प्रकरणात जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे तो कुप्रसिद्धी झाला आहे.
(हेही वाचा – दीड वर्षाच्या मुलाला ४ दिवसात दिले ४ इंजेक्शन, गॅंगरीनमुळे बाळाचा मृत्यू! जळगावात डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल)
Join Our WhatsApp Community