एका ज्वेलर्स मालकाच्या डोक्यात प्लंबिंगच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या पान्याने प्रहार करून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कांदिवली पश्चिम येथे घडली. (Kandivli Jewellery Shop Owner Assaulted With Plumbing Wrench) हा हल्ला आर्थिक वादातून झाल्याची माहिती कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांनी दिली. (Kandivali Police Station)
विकास बाफना (४६) असे जखमी झालेल्या ज्वेलर्स मालकाचे नाव आहे. कांदिवली पश्चिम येथील मथुरादास रोड परिसरातील प्रीतम ज्वेलर्स (Pritam Jeweller) नावाचे बाफना यांचे ज्वेलरीचे दुकान आहे. शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ज्वेलरी शॉपचे मालक विकास बाफना हे दुकानात असताना या दुकानाचा जुना मालक प्रवीण मकवाना हा दुकानात आला होता. बाफना यांचे दुकान पूर्वी प्रवीण मकवाना याचे होते व त्याने ते बाफना यांना विकले होते, या विक्रीतून दोघांत आर्थिक व्यवहारातून वाद होता. बाफना यांच्याकडे मकवाना हा २ कोटी रुपये मागत होते, त्यातून दोघांत शाब्दिक वाद होऊन मकवाना याने सोबत आणलेला प्लंबिंगच्या पान्याने बाफना यांच्या डोक्यात प्रहार केला. (Crime News)
(हेही वाचा – Drug Smuggling : डीएमकेचे माजी नेते जाफर सादिक अटकेत)
या हल्ल्यात बाफना हे गंभीर जखमी झाले, त्यांना नोकरांनी तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी कांदिवली पोलिस ठाण्यात मकवाना विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला तात्काळ अटक करण्यात आले आहे अशी माहिती कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांनी दिली. (A case under section 307 (attempt to murder) of the Indian Penal Code was filed at Kandivali police station) पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बाफना यांचे दुकान पूर्वी मिठाईचे दुकान होते, मकवाना याने ते बाफना यांना २ कोटी रुपयांना विकले होते, परंतु या आर्थिक व्यवहारातून दोघांत वाद होता, या वादाला शनिवारी हिंसक वळण लागले अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. (Crime News)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community