झारखंड: NEET Pepar लीक प्रकरणी तिघांना अटक

तपासानंतर सीबीआयने उगारला कारवाईचा बडगा

131
झारखंड: NEET Pepar लीक प्रकरणी तिघांना अटक
झारखंड: NEET Pepar लीक प्रकरणी तिघांना अटक

नीट-यूजी पेपर लीक (NEET-UG paper leak) प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. सलग 4 दिवसांच्या तपासानंतर सीबीआयच्या (CBI) पथकाने झारखंडच्या ओएसिस स्कूलचे मुख्याध्यापक आणि नीट शहर समन्वयक एहसान उल हक, उपप्राचार्य मोहम्मद इम्तियाज (Vice Principal Mohammad Imtiaz) आणि अन्य एका व्यक्तीला चर्ही गेस्ट हाऊस येथून अटक करून बिहारच्या पाटणा येथे नेले आहे. (NEET Pepar)

गेल्या 5 मे रोजी देशभरातील विविध केंद्रांवर नीट-यूजी परीक्षा घेण्यात आली. निकाल लागल्यानंतर परीक्षा एजन्सी चव्हाट्यावर आली. नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. (NTA) या परीक्षेसाठी शहर समन्वयक म्हणून झारखंडमधील हजारीबाग येथील ओएसिस शाळेचे प्राचार्य एहसानुल हक यांची नियुक्ती केली होती. यासोबतच शाळेचे उपमुख्याध्यापक इम्तियाज आलम यांची निरीक्षक व केंद्र समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली. पेपर लीक प्रकरण उघडकीस आल्यानंतर सीबीआयने शुक्रवारी तिघांनाही अटक केली. पेपरफुटीप्रकरणी तिघांचीही चौकशी सुरू आहे. सीबीआयची 2 वाहने शुक्रवारी, दुपारी 4.30 वाजता चर्ही गेस्ट हाऊसहून निघाली. त्यात शाळेचे मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापक यांच्याशिवाय 3 जण बसले होते, तिसऱ्याने तोंड झाकले होते. यामध्ये एका पत्रकाराचाही समावेश असल्याचे समजते. परंतु, याबाबत सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी कुठलाही दुजोरी दिलेला नाही. सीबीआयच्या पथकाने येथून 2 काळ्या ब्रीफकेस आणि एक बॉक्सही स्वत:सोबत नेला आहे. ज्या बॉक्समधून प्रश्नपत्रिका फुटल्याचे सांगितले जात होते, ती पेटी घेऊन सीबीआयचे पथक बाहेर आल्याचे सांगण्यात येत आहे. (NEET Pepar)

(हेही वाचा – Bike Silencers : कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर आणि प्रेशर हॉर्नवर फिरवला रोड रोलर)

नीट-यूजी प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआय चार दिवसांपासून हजारीबागमध्ये तपास करत आहे. ओएसिस स्कूलचे मुख्याध्यापक एहसान उल हक यांची एसबीआय टीम गेल्या 60 तासांपासून चौकशी करत होती. बुधवारी संध्याकाळी 5 वाजता सीबीआयने त्यांना चर्ही गेस्ट हाऊसमध्ये आणले. त्यानंतर गुरुवारी दिवसभर सीबीआयचे पथक शहरातील विविध भागात चौकशी व पुरावे शोधत राहिले. एकदा शाळेचे मुख्याध्यापक एहसान उल हक यांना त्यांच्या शाळेच्या कार्यालयात आणले गेले आणि तेथे 2 तास चौकशी केली. शुक्रवारी, 11 वाजेच्या सुमारास, सीबीआयचे पथक शाळेचे मुख्याध्यापक एहसान उल हक यांच्यासह रांची रोडकडे गेले. गाडी रामगढच्या आधी गेस्ट हाऊसवर परतली. या प्रकरणी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. (NEET Pepar)

हेही वाचा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.