जोगेश्वरीच्या (Jogeshwari) कब्रस्तान मध्ये खड्डा खोदण्यावरून झालेल्या वादात दोन गटात तुफान हाणामारी झाली. या मध्ये एका गटाने दुसऱ्या गटावर रिव्हॉल्व्हर रोखल्याचा आरोप पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणी आंबोली पोलिसांनी दोन्ही गटाविरुद्ध परस्पर गुन्हा नोंद केला आहे.
जोगेश्वरी पश्चिम येथील एस.व्ही रोड, अग्रवाल इस्टेट या ठिकाणी नूर मंजिल मुस्लिम कब्रस्तान आहे. या कब्रस्तान मध्ये मागील अनेक वर्षांपासून फरीद गुलबाद शहा आणि दिलावर मलकानी यांच्यात कब्रस्तानातात मृतदेह पुरण्यासाठी खोदण्यात येणाऱ्या खड्ड्यावरून वाद सुरू आहे. हे दोन्ही कुटुंब खड्डे खोदण्यासाठी कब्रस्तान मध्ये स्वतःचा अधिकार गाजवत आहे. १७ नोव्हेंबर रोजी मलकानी यांनी कब्रस्तान मध्ये दोन फलके लावली त्यात त्यांनी लोकांना आवाहन केले की, कब्र खोदण्यासाठी लोकांनी मलकानी यांच्याकडे संपर्क साधावा असा मजकूर असलेले दोन फलक लावण्यात आले होते.
मलकानी यांनी कब्रस्तान मध्ये स्वतःचे फलक लावल्याची माहिती शहा कुटुंबियांना मिळाली असता, फरीद शहा आणि त्यांची मुले पत्नी सुना कब्रस्तान येथे गेले व त्यांनी मलकानी यांनी लावलेले फलक उखडून टाकले, फलक काढल्याची माहिती मिळताच दिलशाद मलकानी हे ५ ते ६ जणांना घेऊन कब्रस्तान येथे आला व त्याने फलक काढण्यावरून शहा कुटुंबियांना जाब विचारून खड्डे खोदण्यासाठी आमचा आधिकार असल्याचे सांगितले. कब्र खुदाई वादातून दोन्ही गट समोरा समोर आले व त्यांच्यात शाब्दिक वाद होऊन हा वाद हाणामारी पर्यंत गेला. दोन्ही गट कब्रस्तानमध्ये भिडले कब्रस्तान मध्ये एकमेकांना गाडण्याची भाषा करून चाकू, सुरे रिव्हॉल्व्हर सारखे घातक हत्यारानी एकमेकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली.
मलकानी यांनी त्यांच्याजवळची रिव्हॉल्वर काढून आमच्यावर रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप शहा कुटुंबीयांनी केला. तर मलकानी यांनी देखील शहा कुटुंबानी चाकू सुऱ्याने हल्ला केल्याचा आरोप केला आहे. अखेर हे प्रकरण आंबोली पोलिसांपर्यत गेले पोलिसांनी कब्रस्तान येथे धाव घेऊन दोन्ही कुटुंबांना शांत करून दोन्ही गटाच्या तक्रारी दाखल करून परस्पराविरोधी दंगल, शस्त्र विरोधी कायदा, मारहाण करणे या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community