पत्रकार निखिल वागळे यांची जीभ घसरली आहे, एक्स (ट्विटर)वर वागळे यांनी मुंबई पोलिसांबद्दल (Mumbai Police) अपशब्द वापरला आहे. ४८ तास उलटून ही तक्रार प्रत मिळाली नसल्यामुळे वागळे यांनी माहिम पोलीस ठाणे काही उपयोगाचे नाही, पोलीस ठाणे भंगारात काढा असे बोलून मुंबई पोलिसांबद्दल (Mumbai Police) वागळेंनी ‘नालायक’ या अपशब्दाचा प्रयोग केला आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एक्स या अधिकृत खात्यावर वागळे यांचे आरोप फेटाळून लावत त्यांना “योग्य” भाषा वापरण्याचा सल्ला दिला. (Mumbai Police)
“मुंबई पोलिस (Mumbai Police) नालायक आहेत. ४८ तास झाले तरी तक्रारीची प्रत मिळालेली नाही. माहीम पोलिस ठाणे रद्दीत विक्रीसाठी काढा “अशा शब्दात जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी एक्सवर मराठीत पोस्ट टाकली आहे. प्रत्युत्तरात, मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) त्यांना उत्तर दिले “आम्ही सखोल माहिती घेतली आहे. आपल्या तक्रारीवरून दि. २४/०१/२४ रोजी अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला असून आपणास कळविण्यात आलेले आहे. अधिक माहिती घेण्यासाठी आपल्या घरी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आपण भेटण्यास नकार दिला. (Mumbai Police)
आम्ही सखोल माहिती घेतली आहे. आपल्या तक्रारीवरून दि. २४/०१/२४ रोजी अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला असून आपणास कळविण्यात आलेले आहे. अधिक माहिती घेण्यासाठी आपल्या घरी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आपण भेटण्यास नकार दिला. तक्रारीची प्रत पोलीस ठाणे येथून प्राप्त करून घेण्याबाबत सुध्दा… https://t.co/gMvMgCkD3l
— मुंबई पोलीस – Mumbai Police (@MumbaiPolice) January 26, 2024
तक्रारीची प्रत पोलीस ठाणे येथून प्राप्त करून घेण्याबाबत सुध्दा आपणास कळविण्यात आलेले आहे. व्यक्तीविशेषसाठी घरपोच प्रत पोहचविण्याचे प्रावधान नाही. आपण शिक्षित आहात, संयमित भाषा वापरणे अपेक्षित आहे “असे ‘एक्स’ वर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) म्हटले आहे. पोलिस विभागाने पुढे सांगितले की, वागळे यांना पोलिस ठाण्यातून तक्रारीची प्रत घेण्यास सांगितले आहे. तक्रारची प्रत एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या घरी पोहोचवण्याची कोणतीही तरतूद नाही.” असे मुंबई पोलिसांच्या अधिकृत एक्सवर वागळे ना उत्तर दिले आहे. (Mumbai Police)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community