शिवसेना (उबाठा) आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांची मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून पाच तास चौकशी करण्यात आली. ही चौकशी कोविड जम्बो घोटाळा प्रकरणाशी संबंधित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कोविड जम्बो सेंटर घोटाळा प्रकरणी मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे, या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने ३२ कोटी रुपयांच्या मनी लॉण्डरिंग प्रकरणी वेगळा गुन्हा दाखल करून या गुन्ह्यात नुकतीच शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि डॉ. किशोर बिसले यांना इडिकडून अटक करण्यात आली आहे.
दरम्यान कोविड जम्बो सेंटर घोटाळाचा वेगळा तपास मुंबई आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे, दरम्यान या तपासात आर्थिक गुन्हे शाखेने आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना चौकशीसाठी समन्स जारी केले होते. सोमवारी दुपारी १ वाजता सूरज चव्हाण हे मुंबई पोलीस मुख्यालयात असणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेत चौकशीसाठी हजर झाले होते. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने सूरज चव्हाण यांची तब्बल पाच तास चौकशी केल्या नंतर त्याचा जबाब नोंदविण्यात आला आहे.
१२ हजार कोटीचे प्रकरण वेगळे
आर्थिक गुन्हे शाखा करीत असलेल्या कोविड जम्बो टेंडर घोटाळ्याशी आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या एसआयटीकडून सुरू असलेला कॅगच्या अहवालानुसार सुरू असलेला १२ हजार कोटीचा दहिसर येथील जमीन घोटाळा याचा काहीही सबंध नसून १२ हजार कोटी घोटाळा हे प्रकरण वेगळे असून या प्रकरणात माजी नगरसेवक सदानंद परब यांची गेल्या आठवड्यात एसआयटी कडून ९ तास चौकशी करण्यात आली होती.
Join Our WhatsApp Community