बीआरएस पक्षाच्या नेत्या के. कविता (K. Kavitha) यांना दिल्ली कोर्टाने ९ एप्रिलपर्यंत न्यायायलीयन कोठडी सुनावली आहे. मनी लॉंड्रिंग प्रकरणात दिल्ली राऊस अव्हेन्यू न्यायालयातील सुनावणीनंतर त्यांना मंगळवारी ही शिक्षा सुनावण्यात आली. यापूर्वी दिल्ली अव्हेन्यू न्यायालयाने के. कविता यांना ईडी कोठडी सुनावली होती. त्यामुळे ईडीची कोठडी संपल्यानंतर मंगळवारी, (२६ मार्च) न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाच्या या सुनावणीपूर्वी बीआरएस नेत्या के. कविता यांनी दाखल केलेल्या अंतरिम जामीन याचिकेवर दिल्ली न्यायालयात सुनावणीसाठी सोमवारी, १ एप्रिलची तारीख निश्चित केली आहे, असे वृत्त ANI या वृत्तसंस्थेने दिले आहे.
Delhi excise policy money laundering case | Delhi court sends BRS leader K Kavitha to judicial custody till April 9 https://t.co/vVcXkmUUaC
— ANI (@ANI) March 26, 2024
के. कविता यांना ईडी कोठडीच्या शेवटी राऊस अव्हेन्यू न्यायालयात आणले, त्यावेळी ही मनी लॉण्ड्रींग केस नाही, तर राजकीय लॉण्ड्रींग केस आहे, दिल्ली मध्य धोरण घोटाळा प्रकरण एक बनावट आणि खोटा खटला आहे, असा आरोप करत तपास यंत्रणा आणि सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला तसेच आम्ही स्वच्छ प्रतिमेने बाहेर येऊ, असा विश्वासदेखील के कविता यांनी व्यक्त केला आहे.
Join Our WhatsApp Community