मुंबईतील घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी आरोपींवर कारवाई होत असतानाच आता कल्याणमध्येही होर्डिंग पडल्याची (Kalyan Hoarding Collapse) घटना समोर आली आहे. येथील गजबजलेल्या सहजानंद चौकात हा अपघात झाला. या घटनेत अनेक वाहने होर्डिंगखाली दबली गेली. या अपघातात दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि अग्निशमन दलाला पाचारण करून होर्डिंग हटवण्यात आले.
Another hoarding collapse in Maharashtra , this in Kalyan, Thane.
No one injured, thankfully pic.twitter.com/73f7qe39J9— Sneha Mordani (@snehamordani) August 2, 2024
(हेही वाचा –Sion Bridge : वाहतुकीसाठी सायन पूल बंद! ऑफिसला जाणारे कर्मचारी वाहतुक कोंडीत अडकले)
या पडलेल्या होर्डिंगखाली (Kalyan Hoarding) दहा ते बारा दुचाकी आहेत. तसेच एक चारचाकी गाडीदेखील आहे. सुदैवाने चारचाकीतील चालक होर्डिंग पडण्याच्या काहीवेळ आधीच गाडीतून बाहेर पडला होता. गाडीवर होर्डिंग पडल्याने कारचे नुकसान झाले आहे. तसेच रस्त्यावरचं होर्डिंग पडल्याने रस्त्यात ट्रॅफीक झाले आहे. (Kalyan Hoarding Collapse)
(हेही वाचा –Sion Bridge : वाहतुकीसाठी सायन पूल बंद! ऑफिसला जाणारे कर्मचारी वाहतुक कोंडीत अडकले)
या होर्डिंगला परवाना मिळाला होता पण आता अशी दुर्घटना का झाली? याचा तपास केला जाईल. यात किती गाड्यांचे नुकसान झाले याचा पंचनामा करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. कॉन्ट्रॅक्टरने बॅनर लावताना योग्य एसओपीचे पालन केले नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करतोय, असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.नुकसान भरपाई कॉन्ट्रॅक्टरमार्फत दिली जाईल हे पाहून. यात कॉन्ट्रॅक्टरचा निष्काळजीपणा दिसत असून त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. तसेच विभागताली संबंधित प्रश्न लवकरच मार्गी लावले जातील, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. (Kalyan Hoarding Collapse)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community