कल्याणच्या खडकपाडा भागात अखिलेश शुक्ला नावाच्या एका सरकारी अधिकाऱ्याने अभिजित देशमुख या मराठी माणसाला मारहाण केल्याची घटना (Kalyan Marathi Family Case) घडली आहे. कल्याणच्या योगीधाम परिसरातील अजमेरा सोसायटीत ही घटना ( Kalyan Crime ) घडली आहे. अखिलेश शुक्ला (Akhilesh Shukla) यांनी अभिजित देशमुख (Abhijit Deshmukh) यांना गुंड बोलवून मारलं, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. या घटनेत अभिजित देशमुख जखमी झाले आहेत. यावरुन आता मनसे (MNS) नेते आक्रमक झाले आहेत.
हेही वाचा-Jaipur Chemical tanker Explosion : केमिकल टँकरच्या भीषण स्फोटात ५ जणांचा होरपळून मृत्यू
मुंबईत मराठी माणसावर होणारा अन्याय कदापी सहन केला जाणार नाही. कल्याणमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी मूळात ही घटना माजी मुख्यमंत्री यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघातली आहे. या घटनेनंतर त्यांनी एक चक्कार शब्दही काढलेला नाही. एरवी मराठी माणसासाठी गळे काढतात, अशी टीका अविनाश अभ्यंकर (Avinash Abhyankar) यांनी केली. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेऊन तात्काळ अखिलेश शुक्लाला अटक करावी. त्यांच्या मारहाणीत एक व्यक्ती गंभीर जखमी आहे. अन्यथा मनसेस्टाईलने रस्त्यावर उतरून उत्तर दिलं जाईल.
मनसेने मराठी माणसासाठी काय केलंय रस्त्यावर उतरून हे भूतकाळात पाहिलं आहे. वर्तमान काळातही मनसेची भूमिका तिच राहिल. मुंबई काय खायचं कुठे रहायचं हे मराठी माणसाला शिकवू नये. मुंबईत पहिलं मराठी माणसाचचं ऐकलं जाईल नंतर इतरांचं आणि हो मराठी माणसासाठी शिवतीर्थची दार ही सदैव उघडी आहेत. मराठी माणसावर अन्याय झाला तर मनसे स्टाईल उत्तर दिलं जाईल असा इशारा मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी दिला आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community