Kalyan Marathi Family Case : मराठी माणसाला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लाचे दिवस फिरले; आरटीओने केली मोठी कारवाई

221
Kalyan Marathi Family Case : मराठी माणसाला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लाचे दिवस फिरले; आरटीओने केली मोठी कारवाई
Kalyan Marathi Family Case : मराठी माणसाला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लाचे दिवस फिरले; आरटीओने केली मोठी कारवाई

कल्याणच्या खडकपाडा भागात अखिलेश शुक्ला नावाच्या एका सरकारी अधिकाऱ्याने अभिजित देशमुख या मराठी माणसाला मारहाण केल्याची घटना (Kalyan Marathi Family Case) घडली आहे. कल्याणच्या योगीधाम परिसरातील अजमेरा सोसायटीत ही घटना ( Kalyan Crime ) घडली आहे. अखिलेश शुक्ला (Akhilesh Shukla) यांनी अभिजित देशमुख (Abhijit Deshmukh) यांना गुंड बोलवून मारलं. अखिलेश शुक्ला (Akhilesh Shukla) हा सोसायटीतील रहिवाशांना सनदी अधिकारी (IAS officer) असल्याचे सांगून धमकावत होता. तो खासगी गाडीवर अंबर दिवा लावून फिरायचा. (Kalyan Marathi Family Case)

हेही वाचा-Mumbai BEST Buses : आता बस झाले, मुंबईकरांना बेस्ट शब्द उच्चारताना लाज वाटू देऊ नका!

अखिलेश शुक्ला आयएएस अधिकारी सांगून स्थानिक रहिवाशांना धमकावत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. शुक्ला त्याच्या खासगी गाडीमध्ये अंबर दिवा लावून रुबाब करत होता. मात्र, त्याचा हाच रुबाब आता पोलिसांनी उतरवला आहे. कल्याण खडकपाडा पोलिसांनी अखिलेश शुक्ला याची खाजगी गाडी जप्त केली आहे. या गाडीमधून अंबर दिवा देखील पोलिसांनी हस्तगत केला आहे. खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंबरनाथ वाघमोडे यांनी गाडीची तपासणी केली असून गाडीतून अंबर दिवा जप्त केला आहे. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. (Kalyan Marathi Family Case)

9500 रुपयांचा दंड आकारला 
कल्याण आरटीओने शुक्ला वापरत असलेल्या गाडीला दंड आकारला आहे. 9500 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. कोणताही अधिकार नसताना गाडीवर अंबर दिवा वापरल्यामुळे दिवा जप्त करून गाडीचा ताबा घेण्यात आला आहे. कल्याण उपप्रादेशिक परिवहन महामंडळाने अखिलेश शुक्ला याची खासगी गाडी ताब्यात घेतली असून या गाडीला नऊ हजार पाचशे रुपयांचा दंड आकारला आहे. इन्शुरन्स आणि पीयूसी संपला असतानाही ही गाडी गेली चार वर्ष रस्त्यावर धावत आहे. त्याचप्रमाणे अधिकार नसतानाही बेकायदेशीर रित्या या गाडीमध्ये अंबर दिवा लावल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. अंबर दिवा जप्त करून गाडी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे.(Kalyan Marathi Family Case)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.