कल्याणच्या खडकपाडा भागात अखिलेश शुक्ला नावाच्या एका सरकारी अधिकाऱ्याने अभिजित देशमुख या मराठी माणसाला मारहाण केल्याची घटना (Kalyan Marathi Family Case) घडली आहे. कल्याणच्या योगीधाम परिसरातील अजमेरा सोसायटीत ही घटना ( Kalyan Crime ) घडली आहे. अखिलेश शुक्ला (Akhilesh Shukla) यांनी अभिजित देशमुख (Abhijit Deshmukh) यांना गुंड बोलवून मारलं, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. या घटनेत अभिजित देशमुख जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर मुंबईतल्या सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Kalyan Marathi Family Case)
योगीधाम परिसरात मराठी माणसांचा संताप
अभिजीत देशमुख आणि त्यांचे भाऊ धीरज देशमुख या दोघांना परप्रांतीयांच्या टोळक्याकडून लोखंडी रॉडने मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी रात्री कल्याणच्या योगीधाम परिसरात मराठी माणसांचा संताप पाहायला मिळाला. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मराठी माणसांनी एकत्र येऊन योगीधाम परिसरामध्ये बॅनर लावून निषेध केला. यावेळी योगीधाम परिसरात मराठी माणसांनी गर्दी केली होती. या जमावाने अजमेरा हाईटस् (Ajmera Heights Kalyan) इमारतीमध्ये जाऊनही घोषणाबाजी केली. हल्लेखोराला अटक केली नाही तर योगीधाम परिसरातील व्यापारी संघटनानी बंदची घोषणा केली आहे. (Kalyan Marathi Family Case)
प्रकरण काय ?
कल्याणच्या योगीधाम परिसरात असणाऱ्या अजमेरा हाईटस् या उच्चभ्रू रहिवाशांच्या सोसायटीत हा प्रकार घडला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात MTDC मध्ये अकाउंट मॅनेजर असलेले अखिलेश शुक्ला आणि वर्षा कळवीकट्टे हे अजमेरा सोसायटीत आजूबाजूला राहतात. नेहमीप्रमाणे अखिलेश शुक्ला यांच्या पत्नी गीता या घराबाहेर देवपूजा करुन धूप लावतात. या धूपाचा प्रचंड धूर होतो. हा धूर वर्षा कळवीकट्टे यांच्या घरात जायचा. या धुराचा घरात असलेल्या तीन वर्षाच्या बाळाला त्रास व्हायचा. तसेच घरात असलेली वयोवृद्ध आईलाही दम लागायचा. त्यामुळे कळवीकट्टे कुटुंबीयांनी शुक्ला यांना बाहेर धूप न लावण्याविषयी विनंती केली होती. यावरुन अखिलेश शुक्ला यांची पत्नी गीता शुक्ला यांनी उद्दामपणे कळवीकट्टे कुटुंबीयांशी वाद घालायला सुरुवात केली. (Kalyan Marathi Family Case)
हेही वाचा-Maharashtra Assembly Winter Session : मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला आमदारांकडून हरताळ!
हा वाद सुरू असताना बाजूला राहणारे अभिजीत देशमुख आणि त्यांचे भाऊ धीरज देशमुख यांनी वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करत वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. देशमुख यांनी वाद सोडण्याचा प्रयत्न केला. याचा राग शुक्ला याला आला आणि शुक्लाने 10 ते 15 गुंडांना बोलावून देशमुख बंधूंना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या घटनेत अभिजित देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांना मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. शुक्ला हे या सोसायटीत वादग्रस्त असल्याचे समोर आले आहे. अनेक मराठी माणसांना शुक्ला याने त्रास दिला आल्याचा आरोप सोसायटीतील नागरिकांनी केला आहे. (Kalyan Marathi Family Case)
हेही वाचा-International Human Solidarity Day काय आहे महत्त्व?
संबंधित घटनेमध्ये कल्याण खडकपाडा पोलिसांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. योग्य कारवाई केली असल्याची माहिती खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबरनाथ वाघमोडे यांनी दिली आहे. दरम्यान, आता पोलिसांकडून एमटीडीसीमध्ये अकाऊटंट असलेल्या मुजोर अखिलेश शुक्ला आणि त्याच्या कुटुंबावर काय कारवाई केली जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Kalyan Marathi Family Case)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community