Kandivali : एका चार वर्षाच्या मुलाचे अपहरण करून त्याची हत्या (Murder) करण्यात आल्याची खळबळजनक घटना कांदिवली पश्चिम येथील इराणीवाडी (Iraniwadi) येथे उघडकिस आली आहे. या घटने प्रकरणी कांदिवली पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरुद्ध अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मारेकऱ्यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत. या घटनेने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस सूत्रांने दिलेल्या महितीनुसार अपहरणकर्ता हा सायकलवरून आला होता, आणि आजीच्या कुशीत झोपलेला असताना मुलाचे अपहरण केले. (Kandivali) अंश अन्सारी (Ansh Ansari murder) असे हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे.
अंश हा आईसोबत कांदिवली पोयसर (Poyser) येथे राहण्यास होता. अंशच्या आईने पहिल्या पतीला सोडून दिले होते आणि दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करून राहत होती. अंश आणि त्याची आई त्याच्या आजीला भेटायला गुरुवारी कांदिवली इराणीवाडी येथे गेले होते. अंशने काही दिवस आजीसोबत राहण्याचे ठरवले होते. शनिवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास, अंश हा आजीसोबत झोपडीबाहेर झोपलेला होता. दरम्यान, सायकलवरून एक अनोळखी व्यक्ती आला आणि त्याने आजीच्या कुशीत झोपलेल्या अंशला घेऊन गेला. त्यानंतर त्याने अंशची हत्या करून काही वेळाने पुन्हा सायकलवरून त्या परिसरात आला आणि अंशचा मृतदेह आजीच्या झोपडीपासून २० फूट दूर अंतरावर सोडून निघून गेला.